चाळीसगावला रमेशचंद्र अग्रवाल यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ लघु ऑक्सिजन संचाचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 12:11 AM2021-06-05T00:11:14+5:302021-06-05T00:12:26+5:30
चाळीसगाव : दिवंगत उद्योजक व चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त रमेशचंद्र मांगीलाल अग्रवाल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ येथील कोरोना उपचार केंद्रात शुक्रवारी ...
चाळीसगाव : दिवंगत उद्योजक व चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त रमेशचंद्र मांगीलाल अग्रवाल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ येथील कोरोना उपचार केंद्रात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता अग्रवाल परिवाराच्या वतीने लघु अॉक्सीजन पुरवठा संचाचे लोकार्पण करण्यात आले.
ट्रामा केअर सेंटर मध्ये सुरक्षित अंतर पाळून झालेल्या यासोहळ्याच्या व्यासपीठावर खासदार उन्मेष पाटील, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसिलदार अमोल मोरे, पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड, वैद्यकीय अधिक्षक डॉ. मंदार करंबेळकर, नगरसेवक राजेंद्र चौधरी, पत्रकार किसनराव जोर्वेकर, घृष्णेश्वर पाटील, दीपक पाटील, रोशन जाधव, चाळीसगाव एज्यु. सोसायटीच्या बांधकाम समितीचे चेअरमन योगेश अग्रवाल आदि उपस्थित होते.
यावेळी खासदार पाटील यांनी कै. रमेशचंद्र अग्रवाल यांच्या सर्वस्पर्शी कार्याला उजाळाला दिला. किसनराव जोर्वेकर, लक्ष्मीकांत साताळकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
सद्यस्थिती अग्रवाल परिवारातर्फे गरजू कोरोना रुग्णांना इंजेक्शन व औषधींही पुरविल्या जात आहे. कोरोना उपचार केंद्रासाठी २० बेड यापूर्वीच देण्यात आले आहे.
प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर , उप
प्राचार्य डॉ. अजय काटे, उपप्राचार्य बी.आर.येवले, पत्रकार संघाचे अध्यक्ष आर. डी. चौधरी, सचिव एम. बी. पाटील, दिलीप घोरपडे, देवीदास पाटील, सुनील राजपूत, सोनल साळुंखे, नीलेश छोरिया, सुजित पाटील, योगेश पाटील, विश्वास चव्हाण, समकित छाजेड, शेषराव चव्हाण, सचिन पवार, माजी प्राचार्य डी. टी. साळुंखे, चौधरी, अमीत सुराणा ,लक्ष्मण शिरुडे, राहुल राजपूत, योगेश करंकाळ,बबलू जाधव, किरण मोरे आदि मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन जिजाबराव वाघ यांनी केले. आभार उद्योजक योगेश अग्रवाल यांनी मानले. सर्वांचे आभार मानले.