वाळू व्यावसायिकाकडून दीपक गुप्ता यांना धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:15 AM2021-03-22T04:15:25+5:302021-03-22T04:15:25+5:30
जळगाव : वाळू व्यावसायिक राजेश रोहितलाल मिश्रा (रा. शाहुनगर) यांनी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्ता यांना धमकी दिल्याचा प्रकार ...
जळगाव : वाळू व्यावसायिक राजेश रोहितलाल मिश्रा (रा. शाहुनगर) यांनी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्ता यांना धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, दीपककुमार प्यारेलाल गुप्ता यांनी वाळू व्यावसायिक राजेश रोहितलाल मिश्रा, रा. शाहुनगर यांच्या विरोधात अवैध वाळूची वाहतुकीबाबत अधिकाऱ्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार मिश्रा यांच्या चिंचोली येथील शेताच्या उताऱ्यावर जिल्हाधिकारी यांनी एक कोटी, ७४ लाख ८६ हजार ३२५ रुपयांचा बोजा लावला होता. याचा मिश्रा यांना राग आल्याने दीपक कुमार यांच्याशी १७ मार्च रेाजी रात्री ११ वाजेच्या सुमारास मोबाइलवर संपर्क साधून तुला खोट्या केसेसमध्ये फसवून टाकेल, अशी धमकी दिली. याप्रकरणी गुप्ता यांच्या तक्रारीवरून मिश्रा यांच्याविरुद्ध शहर पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.