ग्रामीण भागात बसेसची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:12 AM2021-07-18T04:12:20+5:302021-07-18T04:12:20+5:30
सेंट अलायंसीस शाळेचे यश भुसावळ येथील सेंट अलायंसीस हायस्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. यात प्रथम क्रमांक प्रनद ...
सेंट अलायंसीस शाळेचे यश
भुसावळ येथील सेंट अलायंसीस हायस्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला.
यात प्रथम क्रमांक प्रनद नीलेश लखोटे(९९.४०), द्वितीय श्रेया विकास पाटील(९८.८० ), तर तृतीय आदित्य मिलिंद सोनवणे (९७.८०) टक्के गुणांसह उत्तीर्ण झाले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे चेअरमन एलिझाबेथ, मुख्याध्यापिका सेलमा यांच्यासह पदाधिकारी व शिक्षकांनी कौतुक केले .
नारखेडे इंग्लिश स्कूलचे यश
भुसावळ येथील एन. के. नारखेडे इंग्लिश मीडियम स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. मृणाल नरेंद्र तारगे आणि आकाश दिलीप तडवी हे ९६ टक्के समान गुण मिळवून शाळेतून प्रथम आले, तर द्वितीय कमलेश सुयोग यावलकर (९५ टक्के), तृतीय खर्चे दिशा प्रवीण (९२.२० टक्के) यांनी यश मिळविले. शाळेमधून एकूण २० विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांच्या वर गुण मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास नारखेडे, सेक्रेटरी मकरंद नारखेडे, चेअरमन पी. व्ही. पाटील, ऑनररी जॉईंट सेक्रेटरी, तसेच प्रभारी नगराध्यक्ष प्रमोद नेमाडे, सभासद विकास पाचपांडे, मुख्याध्यापिका कोमल कुलकर्णी, आदींनी कौतुक केले.