एनआरएचएममध्ये पुरुष परिचारकांना संधी देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:15 AM2021-03-06T04:15:48+5:302021-03-06T04:15:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कराराच्या आधारे भरतीअंतर्गत एनआरएचएममध्ये पुरूष नर्सला परवानगी देण्याची मागणी युनायटेड नर्सिंग असोसिएशनने जिल्हाधिकारी अभिजीत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कराराच्या आधारे भरतीअंतर्गत एनआरएचएममध्ये पुरूष नर्सला परवानगी देण्याची मागणी युनायटेड नर्सिंग असोसिएशनने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, सध्याच्या भरतीत जिल्हा परिषद एनआरएचएम, जळगावने केवळ महिला नर्ससाठी रिक्त जागा दिल्या आहेत. महाराष्ट्रात असा कोणातीही अध्यादेश नाही, की जेथे एनआरएचएममध्ये पुरूष नर्सची नेमणूक करता येणार नाही, असा उल्लेख नाही.
कोविड १९ मध्ये नर्सिंग स्टाफ पुरुष व स्त्रिया यांनी एकत्र काम केले आहे. मात्र, पदभरती प्रक्रियेतून पुरूषांना वगळण्यात आले. या भरतीत पुरूषांनादेखील संधी देण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी युनायटेड नर्सिंग असोसिएशनचे महाराष्ट्र सचिव जिबीन टीसी, रिजीनल प्रेसिडेन्ट अजय मराठे, जिल्हा समन्वयक राहुल पारचा, जितू मोरे, परेश बागुल, रवींद्र रावते, गौरव जोशी, सुशील सरोदे, यश ढंढोरे, गिरीष बागुल, जितेंद्र सोनार, युवाशक्ती फाऊंडेशनचे विराज कावडिया, ललीत करोसिया उपस्थित होते.