दगडी दरवाजावर मांगीर बाबांच्या मूर्तीची पुनर्स्थापना करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:12 AM2021-06-18T04:12:40+5:302021-06-18T04:12:40+5:30
अमळनेर : शहरातील ऐतिहासिक वास्तू दगडी दरवाजावर मातंग समाजाचे आराध्य दैवत समजले जाणारे मांगीर बाबांची मूर्ती प्राचीन ...
अमळनेर : शहरातील ऐतिहासिक वास्तू दगडी दरवाजावर मातंग समाजाचे आराध्य दैवत समजले जाणारे मांगीर बाबांची मूर्ती प्राचीन काळापासून स्थापित केलेली होती. दरवाजाचा बुरूज कोसळल्याने मूर्ती काढून घेण्यात आली होती. तिची पुनर्स्थापना लवकर करावी, अशी मागणी करण्यात आली.
दगडी दरवाजाचे बांधकाम सुरू झालेले नाही. परिणामी, त्याठिकाणी मूर्तीही बसविण्यात आली नसल्याने समस्त मातंग समाजाच्या भावना अनावर होताना दिसत आहेत. मांगीर बाबांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा करून बसविण्यात यावी, अन्यथा येणाऱ्या काळात मातंग समाजाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी न. प. प्रशासनाची असेल याची नोंद घ्यावी, अशा आशयाचे निवेदन नगराध्यक्षा, मुख्याधिकारी यांना देण्यात आले.
यावेळी बहुजन रयत परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बोरसे, सल्लागार हरिश्चंद्र कढरे, शहराध्यक्ष सुरेश कांबळे, समता समितीचे अध्यक्ष समाधान मैराळे, लखन चंदनशिव, रवींद्र चव्हाण, प्रवीण शिरसाठ, सागर अवचिते, शिवलाल जगदाने उपस्थित होते.