भुसावळ : तहसील कार्यालयाच्या आवारातील तसेच संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्राचा करार मागील एका वर्षापूर्वी संपल्याने सेतू सुविधा केंद्राचा संपूर्ण कारभार बंद आहे. ते तत्काळ सुरू करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे शहराध्यक्ष नीलेश कोलते यांनी केली आहे.
आता दहावी, बारावीचे निकाल लागतील आणि पुढील वर्षाच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात होणार आहे. मात्र, सेतू सुविधा केंद्र बंद असल्यामुळे कागदपत्रे कशी मिळवावीत, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा ठाकला आहे म्हणून तहसील कार्यालयाच्या आवारातील सेतू सुविधा केंद्र त्वरित सुरू करावे, अशी मागणी नीलेश कोलते यांच्या नेतृत्वाखाली वाजीद खान, विवेक चौधरी, अक्षय पाटील, जितेंद्र सपकाळे, विशाल सुरवाडे, शेख वजीर यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली.