जळगाव : संघर्ष दिव्यांग कल्याण बहुद्देशीय संस्थेतर्फे १८ ते ४५ या वयोगटांतील सर्व दिव्यांगांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना मंगळवारी निवेदनही देण्यात आले.
यात निवेदनात म्हटले की, ‘शासनाने ३ मे, २०२१ रोजी सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागाने सार्वजनिक आरोग्य विभागाला पाठविलेल्या आदेशात म्हटले आहे की, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमातील तरतुदीनुसार दिव्यांग व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांच्या आजाराची दखल घेऊन प्राधान्य देणे आवश्यक आहे.’
संस्थेचे अध्यक्ष गणेश पाटील, किशोर नेवे, जितेंद्र पाटील, राजेंद्र वाणी, दलू भदाणे, प्रवीण भोई, संतराम एकशिंगे, गोविंद देवरे, शेख शकील, आशा पाटील, संगीता प्रजापती यांनी या निवेदनावर सह्या केल्या आहेत.