आयुध निर्माणी कर्मचाऱ्यांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 11:10 PM2020-09-29T23:10:56+5:302020-09-29T23:11:02+5:30

भुसावळ : निगमीकरणाच्या विरोधात केली घोषणाबाजी

Demonstrations of Ordnance Manufacturing Workers | आयुध निर्माणी कर्मचाऱ्यांची निदर्शने

आयुध निर्माणी कर्मचाऱ्यांची निदर्शने

Next


भुसावळ : येथील आयुध निर्माणी कर्मचाऱ्यांंनी निगमीकरणाच्या निर्णया विरोधात मंगळवारी निदर्शने करीत केंद्र सरकार विरुद्ध घोषणाबाजी केली.
भुसावळ समेत देशातील ४१ आयुध निर्माणीसह संरक्षण क्षेत्रातील अन्य संस्थांचे कर्मचारी १२ आॅक्टोबर २०२० पासून बेमुदत संपावर जाणार आहेत. आयुध निर्माणीचे निगमीकरण रद्द करावे ही मुख्य मागणी असून गेल्या वर्षी ६ दिवस चाललेल्या संपानंतर सरकार व कर्मचारी पक्षांमध्ये झालेल्या संयुक्त बैठकीत मागील ४ संरक्षण मंत्र्यांनी दिलेल्या लिखित आश्वासनाच्या आधारावर निगमीकरण निर्णय रद्द करण्याचा प्रस्ताव कामगार फेडरेशन द्वारे दिला होता. त्यावर संरक्षण सचिवांनी लिखित दिले होते की, असा कोणताही इरादा सरकारचा नाही. त्यामुळे तेव्हा संप मागे घेतल होता. परंतु सरकार द्वारा कोविड-१९ च्या विषम परिस्थितित निगमीकरणाचा निर्णय घेतला आहे.
याविरोधात भुसावळ येथे कामगार युनियन (एआईडिईएफ), मजदुर युनियन इंटक (आयएनडिडब्लुएफ), आ. नि. कर्मचारी संघ (बीपीएमएस) चे अध्यक्ष व महासचिव यांनी संरक्षण सचिव -संरक्षण उत्पादन अनुभाग यांना महाप्रबंधक यांचे मार्फत निवेदन सोपविले. महाप्रबंधक यांच्या वतीने निलाद्रि विश्वास (संयुक्त महाप्रबंधक), बी देविचंद (विभागिय महाप्रबंधक), अंकित धुरकुरे (श्रम कल्याण आयुक्त व कार्यप्रबंधक), मिराज अंजुम (कनिष्ठ कार्यप्रबंधक) यांनी निवेदन स्विकारल. याप्रसंगी सतिश शिंदे, किशोर चौधरी, नवल भिडे, राजकिरण निकम, दिनेश राजगिरे यांनी मनोगत व्यक्त केले, लक्ष्मण वाघ यांनी सुत्र संचालन केले. एम. एस. राऊत यांनी आभार मानले. किशोर बढे, प्रविण मोरे, कैलास राजपुत, अनिल सोनवणे, वसिम खान, चेतन चौधरी, हरिष इंगळे, महेंद्र वानखेडे, विजय साळुंखे, सूर्यभान गाढे आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Demonstrations of Ordnance Manufacturing Workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.