जामनेर, जि.जळगाव : ग्रामीण भागातील शाळांना शिल्लक असलेला पोषण आहार वितरित करण्याचे आदेश असल्याने केवळ ग्रामपंचायत क्षेत्रातील विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळत आहे. शहरी भागातील विद्यार्थी यापासून वंचित राहत आहेत. शासनाने याची दखल घेऊन पालिका व नगरपंचायत क्षेत्रातील विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळवून देण्याची मागणी पालकांकडून होत आहे.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागातील शिक्षणाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशानुसार ग्रामीण भागातील जि.प. व खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप केले जात आहे. हे करीत असताना सोशल डिस्टंसिंगचा वापर केला जात आहे.जामनेर पालिका व शेंदुर्णी नगरपंचायत क्षेत्रातील सुमारे सहा हजार विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित आहेत. सध्या कोरोनासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे शहरी भागातील कष्टकरी व गरिबांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळली आहे. त्यांच्या पाल्यांनादेखील पोषण आहार मिळणे गरजेचे असल्याने शासनाने सुधारित आदेश काढण्याची मागणी होत आहे.जिल्हा परिषदेकडील आदेशानुसार ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिल्लक असलेल्या पोषण आहाराचे विद्यार्थ्यांना वाटप केले जात आहे. आदेशात ग्रामीण भागाचा उल्लेख असल्याने शहरी भागात वाटप केले जात नाही.- विजय सरोदे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी, जामनेर
शालेय पोषण आहारापासून शहरी विद्यार्थी वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2020 3:08 PM
ग्रामीण भागातील शाळांना शिल्लक असलेला पोषण आहार वितरित करण्याचे आदेश असल्याने केवळ ग्रामपंचायत क्षेत्रातील विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळत आहे.
ठळक मुद्देजामनेर पालिका व शेंदुर्णी क्षेत्रातील सहा विद्यार्थी पोषण आहाराविनाग्रामीणप्रमाणेच शहरी भागातही व्यवस्था करावी