महेंद्र रामोशे।अमळनेर : इस्त्राईल आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून ७० वर्ष झाली. मात्र इस्राईलने झपाट्याने प्रगती केली, कारण त्या देशातील लहान मुलालादेखील स्वातंत्र्यासाठी मोजलेली किंमत माहीत असल्याचे सेवानिवृत्त सेनाधिकारी कर्नल अरविंद जोगळेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.ते शहरातील मराठी वाङ्मय मंडळाच्या शारदीय व्याख्यानमालेसाठी व्याख्याते म्हणून आले होते. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपली मते मांडली. स्वातंत्र्याचे मोल तरुण पिढीपर्यत पोहचविण्यासाठी आपण आजपर्यंत देश-विदेशात ३०० च्यावर व्याख्याने दिल्याचे त्यांनी सांगितले.वयाच्या ७० व्या वर्षानंतर लेखनाला सुरुवात कशी झाली याविषयी बोलतांना त्यांनी सांगितले की, ५६ वर्षापर्यंत भारतीय सैन्य दलात सेवा केली.सेवानिवृत्तीनंतर संगणक घेऊन प्रत्यक्ष सेनेत कर्तव्य करीत असताना आलेले अनुभव मांडायला सुरुवात केली आणि त्यानंतर ११ पुस्तके लिहिली. आज साहित्य क्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळाले आहेत.ज्येष्ठांविषयी बोलताना ते म्हणाले ज्येष्ठांनी त्यांना जीवनात मिळालेली शिदोरी आजच्या तरुण पिढीसाठी सोडून दिली पाहिजे. तरुण पिढीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन सैन्य दलात भरती व्हावं अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली. प्रश्न विचारण्याची शक्ती थांबली तेव्हा माणूस संपतो असेही त्यांनी सांगितले. आयुष्यात आपण एक फार्म भरला, एक परीक्षा दिली, आणि एकच नोकरी केली, असे अभिमानाने सांगत त्यांनी अनेक चित्रपटात काम केल्याचे म्हटले.कर्नल जोगळेकर यांचा १९६५ आणि १९७१ च्या भारत पाक युद्धासह श्रीलंकेत शांतता सेनेत व मालदीव मोहिमेत सहभाग होता. त्यांना आतापर्यंत महाराष्ट्र शासनाचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.जवळपास १५ चित्रपटातून आणि जाहिरातीतून अभिनय केला आहे. २६ / ११ च्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी ताज हॉटेलमध्ये त्यांचे ‘१९४७ ते एके ४७’ या विषयावर भाषण झाले ते प्रचंड गाजल्याची आठवण त्यांनी सांगितली. देशाभिमान जागविण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केली.
देशाभिमान जपण्याची नितांत गरज : कर्नल अरविंद जोगळेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 10:14 PM
इस्त्राईल आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून ७० वर्ष झाली. मात्र इस्राईलने झपाट्याने प्रगती केली, कारण त्या देशातील लहान मुलालादेखील स्वातंत्र्यासाठी मोजलेली किंमत माहीत असल्याचे सेवानिवृत्त सेनाधिकारी कर्नल अरविंद जोगळेकर यांनी सांगितले.
ठळक मुद्देअमळनेर येथील शारदीय व्याख्यानमालेत गुंफले पहिले पुष्पमराठी वाङ्मय मंडळातर्फे व्याख्यानमालेचे आयोजनदेशविदेशात दिली ३०० पेक्षा जास्त व्याख्याने