धरणगाव महाविद्यालयातील स्नेहसंमेलनात युवक-युवतींचा जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 05:25 PM2020-02-16T17:25:23+5:302020-02-16T17:25:48+5:30
कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलन व वार्षिक बक्षीस वितरण सोहळ्यात युवक--युवतींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून जल्लोष केला.
धरणगाव, जि.जळगाव : येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलन व वार्षिक बक्षीस वितरण सोहळ्यात युवक--युवतींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून जल्लोष केला. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष डॉ.अरुण कुळकर्णी होते.
उद्घाटन महंत भगवान महाराज यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आले. यावेळी माजी विद्यार्थी अॅड.दिलीप बोरसे यांची वकील संघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून डॉ.अजय शास्त्री, डॉ.गीताजंली ठाकूर, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड.दिलीप बोरसे, डॉ.मिलिंद डहाळे, संचालिका नीना पाटील, प्राचार्य डॉ.टी. एस.बिराजदार, पी.आर.चे मुख्याध्यापक, उपप्राचार्य डॉ.के.एम.पाटील, प्रा.बी.एन.चौधरी, उपप्राचार्य डॉ.के.एम.पाटील, प्रा.आर.आर.पाटील, परेवेक्षक प्रा.बी.एल.खोंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी मगनलाल बन्सी, विनोद रोकडे, स्नेहसंमेलन प्रमुख प्रा.आर.पी.चौधरी, प्रा.आर.जे.पाटील, डॉ.के.डी. महाजन, डॉ.दीपक पाटील आदी उपस्थित होते.
स्नेहसंमेलन व वार्षिक बक्षीस वितरण कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते एन.एस.एस., एन.सी.सी., स्काऊट गाईड, रोव्हर रेंजर तसेच विविध परीक्षेतील गुणवंत, विविध स्पधेर्तील यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी गीतगायन, फॅन्सीड्रेस, नाटक, पथनाट्य आदी मनोरंजनात्मक व प्रबोधनात्मक कार्यक्रमात जल्लोष केला.
सूत्रसंचालन प्रा.डॉ.के.डी.महाजन यांनी, तर आभार प्रा.आर.जे.पाटील यांनी मानले.