धरणगावला श्रीमद् भागवत कथा महायज्ञ संकीर्तन सप्ताह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 12:36 AM2019-12-21T00:36:30+5:302019-12-21T00:37:23+5:30
श्री गुरू मोठे बाबा वारकरी सेवा संघ व ग्रामस्थ तथा भजनी मंडळातर्फे सु.नि.सद्गुरू जोग महाराज पुण्यतिथी शताब्दी महोत्सव व श्री गुरु वै.मोठे बाबा आळंदी यांच्या नवव्या पुण्यस्मरणार्थ येथे श्रीमद् भागवत कथा महायज्ञ-संकीर्तन सप्ताह घेण्यात आला.
धरणगाव, जि.जळगाव : येथील श्री गुरू मोठे बाबा वारकरी सेवा संघ व ग्रामस्थ तथा भजनी मंडळातर्फे सु.नि.सद्गुरू जोग महाराज पुण्यतिथी शताब्दी महोत्सव व श्री गुरु वै.मोठे बाबा आळंदी यांच्या नवव्या पुण्यस्मरणार्थ येथे श्रीमद् भागवत कथा महायज्ञ-संकीर्तन सप्ताह घेण्यात आला. या सप्ताहात नामवंत कीर्तनकार महाराजांनी विनादेणगी विना मानधन तत्त्वाने हजेरी लावून कीर्तन रुपाने कृतज्ञता व्यक्त करून सेवा दिली.
११ ते १८ डिसेंबर दरम्यान श्री गुरु वै.मोठे बाबा वारकरी सेवा संघ व भजनी मंडळ यांच्या सहकार्याने हा सप्ताह नुकताच झाला. या सप्ताहात ज्ञानेश्वरजी महाराज जळकेकर, मच्छिंद्र महाराज वाडीभोकर, श्रावणजी महाराज कुकाणेकर, संदीपानजी म.आळंदीकर, संजय महाराज पचपोर, देवरामजी महाराज दौंडकर, सदाशिवजी महाराज साक्रीकर व मुरलीधरजी महाराज कढरेकर या नामवंत कीर्तनकारांनी विना मानधन विनादेणगी सेवा दिली.
या कीर्तन सप्ताहाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घेतला. यासाठी वारकरी संप्रदायातील सेवेकरी, ग्रामस्थ व युवकांनी परिश्रम घेतले.