धरणगाव नगराध्यक्ष पोटनिवडणुकीसाठी २० उमेदवारांचे अर्ज वैध तर १८ अर्ज अवैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 10:11 PM2019-12-13T22:11:43+5:302019-12-13T22:14:04+5:30

धरणगाव पालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीसाठी ३८ पैैकी २० अर्ज वैध तर १८ अर्ज अवैध ठरले.

Dhargaon city president nominates 2 candidates for the by-election | धरणगाव नगराध्यक्ष पोटनिवडणुकीसाठी २० उमेदवारांचे अर्ज वैध तर १८ अर्ज अवैध

धरणगाव नगराध्यक्ष पोटनिवडणुकीसाठी २० उमेदवारांचे अर्ज वैध तर १८ अर्ज अवैध

googlenewsNext
ठळक मुद्देराजकीय पक्षांचे पसंतीक्रमाने दोन-दोन एबी फॉर्म२९ डिसेंबर रोजी होणार आहे मतदान

धरणगाव, जि.जळगाव : येथील पालिकेच्या २९ रोजी होत असलेल्या नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांनी भरलेल्या नामनिर्देशन पत्रांची १३ रोजी छाननी करण्यात आली. एकूण ३८ अर्जांपैैकी २० अर्ज वैध तर १८ अर्ज अवैध ठरले.
उमेदवारी दाखल करताना सर्वच राजकीय पक्षांनी पसंतीक्रमानुसार दोन-दोन उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. त्यात शिवसेनेतर्फे नीलेश सुरेश चौधरी, राजेंद्र महाजन, भाजपतर्फे मधुकर माळी (रोकडे), संजय महाजन, राष्ट्रवादीतर्फे नीलेश भागवत चौधरी, दीपक आनंदा वाघमारे, काँग्रेसतर्फे दीपक जाधव यांना एबी फॉर्म देण्यात आले आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सोयीनुसार ‘शाळा’ होत असल्याची चर्चा आहे.
दि.१३ रोजी झालेल्या छाननीत वैध ठरलेले नामनिर्देशन पत्र असे- नीलेश भागवत चौधरी (राष्ट्रवादी), नीलेश सुरेश चौधरी (शिवसेना), प्रवीण रघुनाथ चौधरी, दीपक गोकुळ जाधव (काँग्रेस), संभाजी गोविंदा धनगर, तौसिफ सलिम पटेल, गोपाल जगन्नाथ पाटील, महेंद्र सुभाष पाटील, वसंतराव शिवदास भोलाणे, महेंद्र गुलाब महाजन, सुरेखा विजय महाजन, संजय छगन महाजन, उमेश जानकीराम माळी, मधुकर बन्सी माळी (भाजप), संजय एकनाथ माळी, मोहम्मद इशाक मोहम्मद यासीन, गुलाबराव रतन वाघ, दीपक आनंदा वाघमारे, हाजी शेख इब्राहीम अब्दुल रसूल.

Web Title: Dhargaon city president nominates 2 candidates for the by-election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.