वंचित आघाडीतर्फे गुरूवारी संवाद दौरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:17 AM2021-07-29T04:17:33+5:302021-07-29T04:17:33+5:30
कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची असोदा ग्रामपंचायतीला भेट जळगाव : दोंडाईचा येथील दादासाहेब रावळ कृषी महाविद्यालयातील विद्यार्थांनी शैक्षणिक अभ्यासक्रमाचा भाग म्हणून ...
कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची असोदा ग्रामपंचायतीला भेट
जळगाव : दोंडाईचा येथील दादासाहेब रावळ कृषी महाविद्यालयातील विद्यार्थांनी शैक्षणिक अभ्यासक्रमाचा भाग म्हणून असोदा ग्रामपंचायतीला नुकतीच भेट दिली. यावेळी दर्शन भोळे या विद्यार्थ्याने नागरिकांना शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाला पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप पाटील यांच्यासह विलास चौधरी, गिरीश भोळे, सुनील पाटील, अजय महाजन आदी पदाधिकारी उपस्थित होते.
चिंचोली येथे शेतकरी बांधवांना मार्गदर्शन
जळगाव : नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील बाभूळगाव येथील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चिंचोली गावाला भेट देऊन, येथील शेतकऱ्यांना शेतीच्या पिकांबाबत मार्गदर्शन केले. यावेळी चिंचोली ग्रामपंचायतीचे सरपंच शरद घुगे, माजी सरपंच अरूण घुगे, उपसरपंच किरण घुगे, आदर्श शेतकरी सुनील लाड, माजी सरपंच कैलास सानप, संजय घुगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
चामुंडामाता रूग्णालयातर्फे आरोग्य शिबिर
जळगाव : चिंचोली येथील श्री चामुंडामाता वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातर्फे धानवड, उमाळा, रायपूर या गावांमध्ये मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. यावेळी डॉ. अलकनंदा पागे, डॉ. समीर साकळीकर, डॉ. प्रफुल्ल पाटील, डॉ. हेमांगी पावडे, डॉ. संदीप गुरूचल आदींनी नागरिकांची तपासणी केली. नागरिकांना मोफत औषधेही देण्यात आली.
मीना सैंदाणे यांचे यश
जळगाव : खान्देश मराठा मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत लेखिका मीना ओंकार सैंदाणे यांनी दुसरा क्रमांक पटकाविला आहे. त्यांनी ‘मन्हा जीवन प्रवास’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.