अमळनेर : तालुक्यातील निमझरी येथील दोघांनी जुन्या वहिवाटीचा शेतरस्ता जेसीबी मशीनने खोदून अनेक शेतकऱ्यांची वाट बंद केल्याने शेतकऱ्यांनी पोलीस व तहसीलदारांकडे न्याय मिळण्याची मागणी केली आहे.
निमझरी येथील शेत गट नंबर १ व ३१ शिवारातील जुन्या वहिवाटीचा रस्ता श्रीकांत गणपत पाटील व सुभाष ओंकार देशमुख यांनी जेसीबी मशीनने खोदून इतर शेतकऱ्यांना जाण्यासाठी अडथळा निर्माण केला आहे. त्यांना समजावण्यास गेले असता ते मारहाणीसाठी अंगावर धावून जातात व महिलांना शिवीगाळ करतात, असेही निवेदनात म्हटले आहे. शेती मशागतीची कामे सुरू झाली असून शेतात जाण्याचा रस्ता बंद झाल्याने शेती करण्यास अडचणी येतील. परिणामी उत्पन्नावर परिणाम होईल, म्हणून तहसीलदार व पोलिसांनी रस्ता मोकळा करून न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनात केली असून निवेदनावर राजेंद्र डोंगर पाटील, श्याम आत्माराम पाटील, राजेंद्र भास्कर पाटील, अरुण साहेबराव पाटील, सुभाष भास्कर पाटील, दिनेश माधवराव पाटील, दिनेश शांताराम पाटील, भगवान बुधा पाटील, विठ्ठल दामू बिरारी, चेतन गणेश पाटील, सचिन शंकर पाटील, शांताराम नीलकंठ पवार यांच्या सह्या आहेत.