पुन्हा रस्ता खोदला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:12 AM2021-06-06T04:12:18+5:302021-06-06T04:12:18+5:30
रस्त्याची दुरवस्था जळगाव : अयोध्यानगरातील मुख्य प्रवेशाच्या रस्त्यावर नुकतीच दुरूस्ती करण्यात आली होती. मात्र, पहिल्याच पावसात या रस्त्यावर पुन्हा ...
रस्त्याची दुरवस्था
जळगाव : अयोध्यानगरातील मुख्य प्रवेशाच्या रस्त्यावर नुकतीच दुरूस्ती करण्यात आली होती. मात्र, पहिल्याच पावसात या रस्त्यावर पुन्हा काही ठिकाणी खड्डे पडले असून त्यात पाणी साचले आहे. मध्यंतरी या रस्त्यावर वाहनधारकांचे प्रचंड हाल होत होते. काहीच दिवसांपूर्वी त्याची दुरूस्ती करण्यात आली आहे.
प्रचंड कोंडी
जळगाव : शनिवारची वर्दळ वाढल्यामुळे अजिंठा चौफुलीवर दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास प्रचंड कोंडी झाली होती. चारही बाजुनी वाहनांची मोठी वर्दळ होती. बराचे वेळ दोनही बाजुंची वाहने खोळंबली होती. या ठिकाणी वाहतूक पोलिसांचा फौजफाटा उपस्थित असतो. मात्र, वर्दळ अधिक असल्याने वाहतूकीची कोंडी होत असते.
जि. प. परिसरात तलाव
जळगाव : शुक्रवारी सायंकाळी काही वेळ मुसळधार पाऊस पडताच जिल्हा परिषदेच्या जुना इमारतीच्या परिसरात पाणी साचल्याने त्यांना तलावाचे स्वरूप आले होते. कर्मचाऱ्यांना या ठिकाणाहून वाहने काढताना मोठी कसरत करावी लागली. त्यातच जि.प.त जाणाऱ्या रस्त्यावरही चिखल साचला होता.