मुक्ताईनगर तालुक्यात डिजिटल शाळा चालतात ‘उसनवारी’च्या विजेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 04:37 PM2018-10-08T16:37:22+5:302018-10-08T16:38:25+5:30

विद्यार्थ्यांना आधुनिक ज्ञान मिळावे, त्यांचा विकास व्हावा यासाठी खासगी शाळांप्रमाणेच जिल्हा परिषदेच्या शाळाही डिजिटल करण्यात येत आहेत. परंतु जिल्हा परिषदेच्या मुक्ताईनगर तालुक्यातील १०८ पैकी ६१ शाळांना आजच्या स्थितीत वीजच नसल्याचे चित्र आहे. थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत शेजारी राहणाऱ्यांकडून वीजपुरवठा घेऊन या शाळांचे कामकाज चालविले जात असल्याचे चित्र आहे.

Digital schools run in Muktainagar taluka | मुक्ताईनगर तालुक्यात डिजिटल शाळा चालतात ‘उसनवारी’च्या विजेवर

मुक्ताईनगर तालुक्यात डिजिटल शाळा चालतात ‘उसनवारी’च्या विजेवर

Next
ठळक मुद्दे१०८ पैकी ६१ शाळांना वीजच नाही, थकबाकीने वीज खंडित ६१ शाळांकडे साडेतीन लाख रुपये विजेची थकबाकीअशा वेळेस शेजारपाजारकडून तात्पुरता वीजपुरवठा

मतीन शेख
मुक्ताईनगर, जि.जळगाव : विद्यार्थ्यांना आधुनिक ज्ञान मिळावे, त्यांचा विकास व्हावा यासाठी खासगी शाळांप्रमाणेच जिल्हा परिषदेच्या शाळाही डिजिटल करण्यात येत आहेत. परंतु जिल्हा परिषदेच्या मुक्ताईनगर तालुक्यातील १०८ पैकी ६१ शाळांना आजच्या स्थितीत वीजच नसल्याचे चित्र आहे. थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत शेजारी राहणाऱ्यांकडून वीजपुरवठा घेऊन या शाळांचे कामकाज चालविले जात असल्याचे चित्र आहे.
लोकवर्गणी आणि समग्र शिक्षा अभियानाच्या निधीसह गाव पातळीवर ग्रामपंचायतींकडून चौदाव्या वित्त आयोगातून सढळ हाताने मदत मिळाल्याने जिल्हा परिषदेच्या १०८ पैकी ८२ शाळांना ‘डिजिटल’ची जोड मिळाली असून, उर्वरित २६ शाळा लवकरच डिजिटल करण्याचा संकल्प शिक्षण विभागाने सोडला आहे.
शिक्षण क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना खेळीमेळीच्या वातावरणात अध्ययन, अनुभव प्रदान करता यावे म्हणून जि.प. शाळांना डिजिटलची जोड दिली जात आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत अध्ययन करणाºया विद्यार्थ्यांना दप्तरमुक्त शिक्षणासाठी बहुतांश शाळांनी पुढाकार घेतला. या माध्यमातून हसत-खेळत शिक्षणप्रणालीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांची गळती आणि शिक्षणाप्रती आवड निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आनंददायी शिक्षण कसे घेता येईल, यासाठी डिजीटल शाळा करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. पुरेशा निधीअभावी प्रत्येक शाळेच्या वर्गखोल्या डिजिटल करणे शक्य नसल्याने लोकवर्गणीवर भर देण्यात आला आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १०८ प्राथमिक शाळा आहेत. शिक्षक, पालक व गावकºयांची लोकवर्गणी आणि समग्र शिक्षा अभियानांतर्गतच्या निधीसह अलीकडे चौदाव्या वित्त आयोगातून अनेक ग्रामपंचायतीने पुढाकार घेत गावाच्या शिक्षणाला डीजीटलची जोड देण्यास पुढाकार घेतल्याने १०८ पैकी ८२ शाळा डिजिटल करण्यात आल्या. यात बहुसंख्य शाळांमध्ये एकापेक्षा जास्त डिजिटल वर्गखोली उभारण्यात आली आहे, तर ८ ते ९ शाळांमध्ये प्रत्येकी चार वर्ग डिजिटल करण्यात आले आहे
शाळा डिजिटल आणि वीज गुल
तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिजिटल करण्याच्या उपक्रमांत शिक्षण विभागाने आघाडी घेतली. कौतुकास पात्र आहे. परंतु डिजिटल झालेल्या शाळांमध्ये वीजपुरवठ्याचा प्रश्न गंभीर आहे. तालुक्यातील सर्व जि.प. शाळांपैकी आज ६१ शाळांमध्ये वीजपुरवठा नाही. वीज बिल थकबाकीपोटी येथील वीज कनेक्शन खंडित करण्यात आले आहे. वीज वितरण कंपनीच्या धोरणानुसार जि.प. शाळेलादेखील व्यावसायिक वीज दर आकारण्यात येते. त्यामुळे विजेचा वापर नसतानाही अव्वाच्या सव्वा वीज बिले येतात. परिणामी वर्षाला सात हजार रुपये सादिल मिळणारी जिल्हा परिषद शाळा मोठमोठ्या आकड्यात आलेले वीज बिल भरणार तरी कसे, हा प्रश्न येतो. ज्या ठिकाणी शालेय व्यवस्थापन समित्या मजबूत आहेत तेथील लोक वर्गणीतून वीज बिल भरून टाकतात. परंतु ज्या ठिकाणी वीज बिल भरले जात नाही तेथे अडचणी येतात. अशा वेळेस डिजिटल उपक्रमास शेजारपाजारकडून तात्पुरता वीजपुरवठा मिळून डिजिटल वर्ग चालवण्याचा आनंद उपभोगला जात आहे.
आज रोजी मुक्ताईनगर तालुक्यातील १०८ शाळांपैकी ६१ शाळांकडे तीन लाख ४० हजार १६० रुपये वीजबिल थकीत आहे. एकीकडे जि.प.शाळांमध्ये शहरी शाळांप्रमाणे डिजिटल शिक्षणाची कास धरली जात आहे. त्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. हे टिकवून ठेवण्यासाठी शाळांना अखंडित वीजपुरवठा मिळवून देण्याची जबाबदारी शासनाने किंवा जिल्हा परिषदेने स्वीकारल्यास खºया अर्थाने ग्रामीण भागात जि.प.शाळेत डिजिटल शिक्षण दिले जाईल





 

Web Title: Digital schools run in Muktainagar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.