वरणगाव, ता.भुसावळ, जि.जळगाव : येथील पालिकेच्या विशेष सभेत सॅनिटरी नॅपकीन मशीन व पाणीटंचाईबाबत उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली.पाणीटंचाईबाबत पालिकेची विशेष सभा बुधवारी पालिकेच्या सभागृहात झाली. नगराध्यक्ष सुनील काळे अध्यक्षस्थानी होते. उपनगराध्यक्ष शेख आखलाक, मुख्याधिकारी बबन तडवी, नगरसेविका मेढे, नसरीनबी कुरेशी, मेहनाजबी पिंजारी, शशी कोलते, प्रतिभा चौधरी, अरुणा इंगळे, वैशाली देशमुख, नगरसेवक राजेंद्र चौधरी, रवींद्र सोनवणे, गणेश चौधरी, विष्णू खोले, बबलू माळी, गणेश धनगर, सुधाकर जावळे उपस्थित होते.या विशेष सभेत वरणगाव शहरासाठी नवीन कूपनलिका करण्याचा ठराव घेण्यात आला. तसेच कठोरा जॅकवेल येथे तापी नदी पत्रात आवर्तनाअभावी पाणीटंचाई उद्भवणार आहे. त्यासाठी तापी नदी पत्रात तरंगणाऱ्या पाणबुडीवरील १५ अश्वशक्तीच्या दोनपंप मशनरी बसवण्याचा व ट्यूबवेल दुरुस्ती करणे तसेच उन्हाळ्यात पाणीटंचाई भासू नये यासाठी तत्काळ उपाययोजना करणे व चौदाव्या वित्त आयोगांंतर्गत महिलांसाठी सार्वजनिक शौचालयाजवळ सॅनेटरी नॅपकीन मशीन बसवणे हे महत्वपूर्ण विषय मंजूर करण्यात आले. तसेच वरणगाव शहरात सुरू असलेल्या विकासात सर्व नगरसेवक देत असलेल्या योगदानाची दखल नगराध्यक्ष सुनील काळे यांनी त्यांचे अभिनंदन करून आभार मानले.सभा लिपिक संतोष वानखेडे, गंभीर कोळी, पाणीपुरवठा अभियंता गणेश चाटे, भयासाहेब पाटील, अधीक्षक प्रशांत सूर्यवंशी यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
वरणगाव पालिकेच्या विशेष सभेत पाणीटंचाईवर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 7:42 PM
वरणगाव पालिकेच्या विशेष सभेत पाणीटंचाईबाबत उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
ठळक मुद्देमहिलांच्या सार्वजनिक शौचालयाजवळ सॅनिटरी नॅपकीन मशीन बसवणारउन्हाळ्यात पाणीटंचाई भासू नये यासाठी तत्काळ उपाययोजना करण्यावर चर्चा