पाचोरा ग्रामीण रुग्णालयात औषधांची वानवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 03:50 PM2020-01-31T15:50:41+5:302020-01-31T15:51:40+5:30
सध्या सर्दीचे दिवस असल्याने बदलत्या हवामानानुसार व व्हायरल इन्फेक्शन झाल्याने खोकल्याची साथ सुरू आहे.
श्यामकांत सराफ
पाचोरा, जि.जळगाव : सध्या सर्दीचे दिवस असल्याने बदलत्या हवामानानुसार व व्हायरल इन्फेक्शन झाल्याने खोकल्याची साथ सुरू आहे. त्यातच ‘कोरोना’सारख्या आजारांनी सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. अशा परिस्थितीत गोरगरीब जनतेला ग्रामीण रुग्णालय हेच औषधी मिळण्याचे आशास्थान असताना या ग्रामीण रुग्णालयात खोकल्याचे कोणतेही प्रकारचे औषध नाही.
सुमारे चार महिन्याप्ाांसून या दवाखान्यात सिरप उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांना खोकल्याचे औषध दिले जात नाही. पाचोरा रुग्णालयात रुग्णांनी खेट्या मारूनही औषध मिळत नाही. परिणामी जनता त्रस्त झाली आहे. यासंदर्भात येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित साळुंखे यांच्याशी संपर्क साधला असता बरेच दिवसांपासून खोकल्याचे औषध उपलब्ध नाही. वरिष्ठ पातळीवर मागणी करूनही औषधांचा साठा उपलब्ध होत नाही. यामुळे आम्ही खोकल्याची सिरप औषधे रुग्णांना देऊ शकत नाही.
दरम्यान, पाचोरा शहरात खोकल्याच्या त्रासाने रुग्ण हैराण झाले आहेत. गारठलेल्या हवामानाने व व्हायरल इन्फेक्शन खोकला व्हायरल इन्फेक्शन होत असल्याने रुग्णालयात तातडीने खोकल्याची औषधे व इतर उपचार उपलब्ध करून द्यावेत, अशी सामान्य जनतेची मागणी आहे.