सुशिक्षित बेरोजगार मक्तेदारावर अपात्रतेची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:13 AM2021-06-05T04:13:41+5:302021-06-05T04:13:41+5:30

भुसावळ : शासनातर्फे सुशिक्षित बेरोजगार युवकांना निविदा प्रक्रियेत प्राधान्य दिले जाते. मात्र, धीरज अशोक चौधरी हे कामावर कार्यरत असतानाही ...

Disqualification action against educated unemployed monopolist | सुशिक्षित बेरोजगार मक्तेदारावर अपात्रतेची कारवाई

सुशिक्षित बेरोजगार मक्तेदारावर अपात्रतेची कारवाई

Next

भुसावळ : शासनातर्फे सुशिक्षित बेरोजगार युवकांना निविदा प्रक्रियेत प्राधान्य दिले जाते. मात्र, धीरज अशोक चौधरी हे कामावर कार्यरत असतानाही त्यांनी पालिकेच्या निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला होता. याबाबत नगरसेवक रवींद्र सपकाळे यांनी पालिका प्रशासनाकडे तक्रार केली होती. याची दखल घेत, मक्तेदार चौधरी यांना निविदा प्रक्रियेत अपात्र घोषित करण्यात आले आहे.

धीरज चौधरी यांनी पालिकेच्या निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला होता. शासकीय नियमानुसार सुशिक्षित बेरोजगारांना निविदा प्रक्रियेत प्राधान्य दिले जाते. मात्र, धीरज चौधरी हे ५ जुलै, २०१७ ते १९ एप्रिल, २०२१ पर्यंत कामावर कार्यरत होते, तरीही त्यांनी शासनाची दिशाभूल करीत, खोटे शपथपत्र सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याच्या नोंदणीत सादर केले. याबाबत नगरसेवक रवींद्र सपकाळे यांनी पालिका प्रशासनाकडे तक्रार केली होती. याची दखल घेत, चौकशी केली असता, सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत पालिकेस कळविले. बांधकाम विभाग व पालिकेची फसवणूक केल्याचे आढळून आल्याने अपात्र घोषित केले आहे.

Web Title: Disqualification action against educated unemployed monopolist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.