ऑक्सिजन आणीबाणी कायम
जळगाव : जीएमसीत सोमवारी ८ मेट्रीक टन लिक्विड ऑक्सिजन असून उद्या टँकर येणार आहे. त्यामुळे ऑक्सिजनची ही आणीबाणी कायम असून यंत्रणेवर याचा ताण जाणवत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रविवारी सकाळी आलेल्या टँकरमधून १६ टन ऑक्सिजन उतरविण्यात आले होते.
१५ पर्यंत निर्बंध
जळगाव : जिल्हा परिषदेच्या १५ टक्के उपस्थितीबाबतचे निर्बंध हे मे एप्रिलपर्यंत कायम राहणार असून त्यानंतर शासनाकडून आलेल्या निर्देशानुसारच निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी के. बी. रणदिवे यांनी सांगितले. पंधरा टक्के उपस्थितीत मात्र, कामे खोळंबत असल्याचे चित्र आहे.
ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
जळगाव : बोदवड तालुक्यातील सुरवाडे येथील ग्रामसेवक संदीप निकम यांनी वित्त आयोगाची ४ लाख ४४ हजार रुपये रक्कम परस्पर काढून घेतल्याच्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना सीईओ डॉ. बी. एन. पाटील यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.