आदिवासी बालकांना आरोग्य स्वच्छता किट वाटप व मोफत दंत तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 04:05 AM2021-07-13T04:05:50+5:302021-07-13T04:05:50+5:30
डॉ. रवींद्र निकम यांचे दातृत्व : डॉ साक्षी गुजराथी यांची मोफत सेवा कन्येच्या वाढदिवसानिमित्त ६६ आदिवासी बालकांना आरोग्य स्वच्छता ...
डॉ. रवींद्र निकम यांचे दातृत्व : डॉ साक्षी गुजराथी यांची मोफत सेवा
कन्येच्या वाढदिवसानिमित्त ६६ आदिवासी बालकांना आरोग्य स्वच्छता किट वाटप व मोफत दंत तपासणी
रत्नापिंप्री, ता. पारोळा : जि.प. प्राथ शाळा धाबे शाळेचे मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे व वरिष्ठ शिक्षक गुणवंतराव पाटील हे सतत या कोरोना काळात बालकांना त्याचे संक्रमण होऊ नये म्हणून विविध सकस आहार व आरोग्याची सुविधा स्वतःसह लोकसहभागातून उपलब्ध करून देत आहेत . याचाच एक भाग म्हणून पारोळा शहरातील डॉ. रवींद्र धुडकू निकम व त्यांच्या दामिनी रवींद्र निकम यांनी ६६ आदिवासी बालकांना ‘स्वच्छता आरोग्य किट’ भेट दिले.
त्यात मास्क, सॅनिटायझर, टूथपेस्ट, टूथब्रश, खोबरे तेल बाटली, व्हॅसलिन, शाम्पू, साबण असा पॅक भेट देऊन बालकांना आरोग्य व स्वच्छतेसाठी मदत केली. यावेळी शाळेकडून बालकांच्या मौखिक व दंत तपासणीसाठी पारोळा तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष मुकेश गुजराथी यांच्या सुकन्या डॉ. साक्षी मुकेश गुजराथी यांनी बालकांची तपासणी केली. त्यात चार बालकांना काही समस्या आढळली. त्यांच्यावर दंतरोग तज्ज्ञ डॉ. विलय शहा यांच्या दवाखान्यात उपचार करण्यात येणार आहेत.