जळगाव - पंचरत्न प्रतिष्ठानतर्फे शहरातील वेगवेगळ्या रहिवासी भागात जाऊन पक्ष्यांसाठी पाणी पिण्याची मातीची भांडी वाटप करण्यात आली.यावेळी पन्नास भांडी प्रतिष्ठानच्यावतीने घरोघरी जाऊन देण्यात आली. भांडी वाटप करीत असताना नागरिकांना पक्ष्यांसाठी पाणी व धान्य ठेवावे असे आवाहन करण्यात येत होते. पुढील काही दिवसात हा उपक्रम सुरू ठेवण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा वैशाली पाटील, नीता भंडारी, सोनल पाटील आदींनी परिश्रम घेतले.