एरंडोल : येथील अष्टविनायक कॉलनीमधील रहिवाशी सरिता रघुवंशी यांची मराठखेडा व तुराटखेडा (ता.पारोळा) येथे २२ वर्ष सेवा झाली. सामाजिक ऋण म्हणून त्यांनी दीपावलीनिमित्त या दोन्ही गावांमधील १०१ आदिवासी महिलांना साड्या व दिवाळीचा फराळ वाटप केला.याप्रसंगी सरपंच रत्नाबाई पाटील बाबूलाल पाटील, रघुनाथ ठाकरे कृष्णा पाटील, संजय मराठे, गोविंदा पाटील, सुभाष मराठे, मधुकर रघुवंशी, सुरेश बडगुजर, प्रल्हाद पाटील, दीपाली रघुवंशी, वसंत पाटील आदी उपस्थित होते.
सेवानिवृत्त शिक्षिकेतर्फे आदिवासी महिलांना साड्या व फराळ वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 3:40 PM