शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातर्फे डॉक्टरांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:12 AM2021-07-03T04:12:07+5:302021-07-03T04:12:07+5:30
नागरिकांनी घेतले ‘जलनेती’चे प्रशिक्षण जळगाव : कोरोना काळात शरीर स्वास्थ्य सुदृढ राहण्यासाठी इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनतर्फे ‘जलनेती अभियान’ अंतर्गंत ...
नागरिकांनी घेतले ‘जलनेती’चे प्रशिक्षण
जळगाव : कोरोना काळात शरीर स्वास्थ्य सुदृढ राहण्यासाठी इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनतर्फे ‘जलनेती अभियान’ अंतर्गंत नागरिकांना नुकतेच जलनेतीचे प्रशिक्षण देण्यात आले. महाराष्ट्र योगा असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. अनिता पाटील यांनी योगाचे फायदे व ‘जलनेती’चे आरोग्यासाठी होणारे फायदे या विषयी माहिती दिली. यावेळी आदित्य दुसाने व नंदिनी दुसाने यांनी प्रत्यक्षात प्रात्यक्षिक सादर करून दाखविले. यशस्वीतेसाठी नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनच्या पदाधिकारी प्रतिभा सपकाळे, ऑल इंडिया स्टेशन युनियनचे अध्यक्ष जानकीराम सपकाळे, सुशील तळवेलकर व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
रेल्वेतील ९१ कर्मचारी सेवानिवृत्त
जळगाव : भुसावळ रेल्वे प्रशासनातील विविध रेल्वे स्टेशनवरील एकूण ९१ रेल्वे कर्मचारी ३० जून रोजी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन कार्यक्रमात डीआरएम विवेककुमार गुप्ता यांना कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. यावेळी एडीआरएम मनोज कुमार सिन्हा, वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी एन.डी. गांगुर्डे आदी रेल्वेचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक कार्मिक अधिकारी वीरेंंद्र वडनेरे यांनी तर आभार दिलीप खरात यांनी मानले.