रेमडेसिविरच संजीवनी असा समज करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:15 AM2021-04-12T04:15:18+5:302021-04-12T04:15:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : रेमडेसिविरचा सर्वत्र तुडवडा निर्माण झाला असून रुग्णांच्या नातेवाईकांची प्रचंड फरफट होत आहे. मात्र, रेमडेसिविर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : रेमडेसिविरचा सर्वत्र तुडवडा निर्माण झाला असून रुग्णांच्या नातेवाईकांची प्रचंड फरफट होत आहे. मात्र, रेमडेसिविर हे इंजेक्शन काही रुग्णांवर प्रभावी ठरते तर काही रुग्णांवर त्याचा प्रभाव होत नाही, त्यामुळे हे इंजेक्शन म्हणजे ब्रम्हास्त्र किंवा संजीवनी असा समज कोणी करू, नये असे आयएमएचे सचिव डॉ. राधेश्याम चौधरी यांनी म्हटले आहे. रेमडेसिविरच्या तुटवड्याबाबत त्यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून मार्गदर्शन केले आहे.
आयसीएमआरनुसार रेमडेसिविर हे इंजेक्शन सौम्य, मध्यम, गंभीर, अतिगंभीर या कोणत्याही प्रकाराच्या रुग्णांवर तेवढे प्रभावी ठरत नाही. रेमडेसिविर देताना रुग्णाचा एचआरसीटी, रक्ताचे नमूने, संसर्गाचे प्रमाण, त्याची ऑक्सिनची पातळी हे सर्व बघूनच त्याचा वापर व्हावा, असेही त्यांनी म्हटले आहे. सद्य जिल्ह्यात साडे अकरा हजार सक्रिय रुग्ण आहेत. ९ हजारांवर रुग्णांना कसलीही लक्षणे नाहीत. २५०० रुग्णांना लक्षणे असून यातील काहीच रुग्णांना रेमडेसिविरची आवश्यकता हा आकडा पाचशे ते सहाशे अशी परिस्थिती आहे.
तुटवडा कायम
रेमडेसिविर इंजेक्शनचा रविवारी तुटवडा कायम होता. मात्र, येत्या दोन ते तीन दिवसात हा तुटवडा दूर होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. एकिकडे स्कोर बघूनच याचा वापर व्हावा असे सांगण्यात येत असताना स्कोर कमी असतानाही हे देणे आवश्यक असून यामुळे पुढील गंभीर धोके टळतात, असाही मतप्रवाह डॉक्टरांकडून समोर येत आहे.