ॲन्टिबॉडीजबाबत आधी होती शंका, आता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:12 AM2021-07-19T04:12:15+5:302021-07-19T04:12:15+5:30

स्टार डमी नंबर : ९४२ आनंद सुरवाडे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण झाल्यानंतर शरीरात कोविडशी लढणाऱ्या ...

Doubts about antibodies were there before, not now | ॲन्टिबॉडीजबाबत आधी होती शंका, आता नाही

ॲन्टिबॉडीजबाबत आधी होती शंका, आता नाही

Next

स्टार डमी नंबर : ९४२

आनंद सुरवाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण झाल्यानंतर शरीरात कोविडशी लढणाऱ्या ॲन्टिबॉडीज निर्माण झाल्या आहेत की नाही, याची नागरिकांकडून विविध लॅबमध्ये जाऊन तपासणी होत होती. मात्र, आता या ॲन्टिबॉडी तपासणीला कुणीही येत नसल्याची माहिती शहरातील काही लॅबकडून मिळाली आहे. एका खासगी लॅबमध्ये क्वचित एक दोन व्यक्ती ॲन्टिबॉडी तपासणी करीत असल्याचे सांगण्यात आले आहे. वास्तविक ॲन्टिबॉडी तपासणी करणे गरजेचे नसल्याचेच डॉक्टरांचे म्हणणे आहे.

पहिला डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनी शरीरात ॲन्टिबॉडीज विकसित होण्यास सुरुवात होते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जिल्हाभरात ८ लाखांवर नागरिकांनी कोविड प्रतिबंधात्मक लस घेतलेली आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून लसीकरणाची गती वाढली आहे. लसीकरणानंतरच कोविडमधून सुरक्षा मिळू शकते, लागण झाली तरी रुग्णालयात दाखल करणे किंवा गंभीर होण्याचे प्रमाण कमी असेल, असा दावा आरेाग्य यंत्रणेकडून केला जात आहे. तसा आयसीएमआरकडूनही सर्व्हे करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील लसीकरण

पहिला डोस ७०२०६२

दोन्ही डोस : ९०४६८६

एकूण लोकसंख्येच्या तुलनेत प्रमाण

१९.२४ टक्के

आधी तपासणी आता नाही

लसीकरणाला अगदी सुरुवात झाली होती. तेव्हा काही तरुण आमच्याकडे येऊन ॲन्टिबॉडी तपासणी करीत होते. मात्र, आता कुणीही येत नसल्याचे मेट्रोपॉलिस लॅबकडून सांगण्यात आले. तर आमच्याकडे आधी ही सुविधा होती. आता काही दिवसांनी अद्ययावत किट आल्यानंतर पुन्हा ही तपासणी सुरू होणार असल्याचे रेडक्रॉस रक्तपेढीचे चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी सांगितले. यासह क्वचित दिवसाला एक दोन व्यक्ती ॲन्टिबॉडीज तपासणीला येत असल्याचे अपोलो डायग्नोस्टिक सेंटरकडून सांगण्यात आले.

कोट

लसीकरणानंतर ॲन्टिबॉडीज तपासणी करावी, अशा शासनाच्या कुठल्याही मार्गदर्शक सूचना नाहीत. त्याची गरजही नाही, दोनही लसी पुरेशा सुरक्षित असून त्या घेतल्यानंतर काही कालावधीनंतर कोविडशी लढण्याची प्रतिकारक्षमता तयार होते.

- डॉ. भाऊराव नाखले, विभागप्रमुख औषधवैद्यकशास्त्र

Web Title: Doubts about antibodies were there before, not now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.