चोपडा : महिलांच्या सर्वांगीण केलेल्या प्रगतीचा अभ्यास करण्यासाठी डॉ. गेल ऑमवेट या विद्वान महिलेने विटनेरला दोन दिवसांची भेट दिली होती, अशी आठवण शेतकरी संघटनेच्या तत्कालिन सक्रिय नेत्या इंदिराताई पाटील यांनी काढली.
डॉ. गेल ऑमवेट यांचे निधन झाले. त्यांच्या आठवणींना उजाळा देताना इंदिराताई पाटील पुढे म्हणाल्या, १९८९ साली विटनेर ग्रामपंचायतीत निवडणुकीत पुरुषांच्या विरोधात १०० टक्के महिलाचे पॅनल विजयी झाले होते व महिलांच्या नावे शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर महिलांची नावे नोंद करण्यात आली होती. ही क्रांती देशात पहिल्यांदा विटनेर गावात घडली होती. त्यावेळी शेतकरी चळवळीचे नेते शरद जोशी यांनी विटनेरला भेट दिली होती. २९ जानेवारी १९८९ रोजी तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्या हस्ते दीक्षाभूमीवर लाखो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत विटनेर गावास ज्योतिबा गाव पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आला होता. या सर्व बाबींच्या अभ्यासासाठी डॉ. गेल ऑमवेट यांनी विटनेरला भेट दिली होती. ती आठवण स्मरणात आहे.