धरणगावचे डॉ.प्रदीप सूर्यवंशी यांचा पंतप्रधान मदतनिधीसाठी अभिनव उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 04:27 PM2020-04-11T16:27:00+5:302020-04-11T16:30:21+5:30

नवजात शिशूतज्ज्ञ डॉ.प्रदीप सूर्यवंशी यांनी आपल्या सहकारी मित्रांसोबत एक अभिनव उपक्रम राबवून ‘कोरोना’ संकट काळात पंतप्रधान मदत निधीसाठी तीन लाख ६२ हजार रुपये मदत पाठवली आहे.

Dr. Pradip Suryavanshi of Dhargaon, an innovative initiative for the Prime Minister's Assistance | धरणगावचे डॉ.प्रदीप सूर्यवंशी यांचा पंतप्रधान मदतनिधीसाठी अभिनव उपक्रम

धरणगावचे डॉ.प्रदीप सूर्यवंशी यांचा पंतप्रधान मदतनिधीसाठी अभिनव उपक्रम

googlenewsNext
ठळक मुद्देसंडे हटके बातमीकोरोना इफेक्ट२७६ डॉक्टरांच्या मदतीने उभी केली तीन लाख ६२ हजारांची मदत

शरद बन्सी
धरणगाव, जि.जळगाव : येथील सुप्रसिद्ध न्यूओनॉटिलॉजिस्ट (नवजात शिशूतज्ज्ञ) डॉ.प्रदीप सूर्यवंशी यांनी आपल्या सहकारी मित्रांसोबत एक अभिनव उपक्रम राबवून ‘कोरोना’ संकट काळात पंतप्रधान मदत निधीसाठी तीन लाख ६२ हजार रुपये मदत पाठवली आहे. त्यांनी लिहिलेले बहुप्रतिक्षित शैक्षणिक पुस्तक न्यूअर इनसाईट्स इन पेरींटालॉजी’ हे त्यासाठी महत्वाचा दुवा ठरले आहे.
डॉ.प्रदीप सूर्यवंशी यांनी नवजात शिशू वैद्यक शास्त्रात आशिया खंडात नावलौकिक मिळविला आहे. सध्या ते पुणे येथील भारती विद्यापीठात सेवा देत आहेत. त्यांनी आपल्या अभ्यास आणि अनुभवातून लिहलेले ‘न्यूअर इनसाईट्स इन पेरीन्टॉलॉजी’ हे शैक्षणिक पुस्तक बहुप्रतिक्षित आहे. बालरोगतज्ज्ञ आणि प्रसूतीतज्ज्ञ यांच्यासाठी ते महत्वपूर्ण आणि मार्गदर्शक ठरणार आहे. प्रकाशनापूर्वी या पुस्तकाची सॉफ्ट कॉपी डॉ.सूर्यवंशी यांनी उपलब्ध करून दिली आहे. जे निवासी डॉक्टर १०० रु. आणि कन्सल्टंट डॉक्टर २०० रुपयांचे त्यांच्या या योजनेत योगदान देतील त्यांना ही सॉफ्ट कॉपी मिळणार आहे. या माध्यमातून डॉक्टर जे योगदान देतील तो निधी पंतप्रधान मदत निधीसाठी पाठवला जाणार आहे. आजपर्यंत एकूण २७६ डॉक्टरांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत तीन लाख ६२ हजार रु. निधी गोळा झाला आहे.
अजूनही ज्या डॉक्टरांना या पुस्तकाची सॉफ्ट कॉपी हवी असेल त्यांनी पीएम फंडात शंभर रुपये पाठवून पावती १िस्र१ंीिीस्र२४१८ं६ंल्ल२ँ@ॅें्र’.ूङ्मे वर पाठवावी. त्यांना कॉपी पाठविण्यात येईल.
डॉक्टर, नर्सेस चोवीस तास, संपूर्ण देशात या संकटात आपली सेवा बजावत आहेत त्यांचे हे काम बघून जनता त्यांच्याकडे रदेवरुप’ म्हणून पहात आहे. अशा परीस्थितीत डॉ.सूर्यवंशी यांचा हा उपक्रम आगळा वेगळा आणि लक्षवेधी ठरला आहे. त्यांनी लिहिलेले हे पुस्तक भविष्यात नवा विक्रम नोंदविणार आहे. परंतु डॉ.सूर्यवंशी यांनी आपल्या स्वत:च्या फायद्याकडे दुर्लक्ष करत ते वैद्यकीय सेवा करणाऱ्या सर्व डॉक्टरांसाठी मोफत उपलब्ध करुन दिले आहे. त्यासाठी पंतप्रधान मदत निधीसाठी १०० रु. अट ठेवली आहे. डॉ.सूर्यवंशी आपल्या क्षेत्रात तज्ज्ञ आहेतच. शिवाय त्यांच्या या अभिनव उपक्रमामुळे त्यांच्यातील संवेदनशील डॉक्टरचे दर्शन घडले आहे. धरणगावकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे.

Web Title: Dr. Pradip Suryavanshi of Dhargaon, an innovative initiative for the Prime Minister's Assistance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.