उधारी फेडण्यासाठी विकावे लागले ठिबक
By ram.jadhav | Published: December 21, 2017 12:49 AM2017-12-21T00:49:46+5:302017-12-21T00:54:24+5:30
कापूस उत्पादक शेतकºयाची व्यथा : गुलाबी बोंड अळीने काढले दिवाळे
आॅनलाईन लोकमत
राम जाधव।
जळगाव दि़ २० - उत्पन्न वाढण्याच्या अपेक्षेने आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरण्यासाठी घेतलेल्या ठिबक सिंचनाचा संचच बोंडअळीमुळे अपेक्षित उत्पन्नाअभावी उधारीचे पैसे फेडण्यासाठी एका कापूस उत्पादक शेतकºयाला विकावा लागला आहे़ गुलाबी बोंडअळीने झालेल्या या अतोनात नुकसानीमुळे अशी परिस्थिती राज्यातील अनेक शेतकºयांची झालेली आहे़ बोदवड तालुक्यातील भानखेडा येथील तुळशीराम गायकवाड या शेतकºयावर ही परिस्थिती ओढवली़
तुळशीराम यांच्याकडे एकूण ९ एकर जमीन आहे़ पैकी वेगवेगळ्या वाणांच्या कपाशीची लागवड गायकवाड यांनी केली होती़ पाणी कमी म्हणून त्यांनी ४ वर्षांपूर्वी ५ एकर क्षेत्रासाठी नामांकित कंपनीचे ठिबक केले होते़ अजून उर्वरित २ एकर क्षेत्रावरील कपाशीलाही पाणी देता यावे, म्हणून त्यांनी यावर्षी उधारीवर आणखी दुय्यम दर्जाचे ठिबक घेतले़ त्यातून जेमतेम कपाशीचे पीक बहरलेही, मात्र आलेल्या कैºयांवर गुलाबी बोंडअळीने मोठ्या प्रमाणावर नुकसान केले़
गायकवाड यांना ७ एकर क्षेत्रामध्ये केवळ २२ क्विंटल कापसाचे उत्पादन मिळाले़ म्हणजेच एकरी ३ क्विंटल १४ किलो इतके, यासाठी त्यांना एकरी किमान १० ते १२ हजार रुपये इतका खर्च आला आहे़ हा कापूस त्यांनी सरासरी ४ हजार रुपये प्रती क्विंटलप्रमाणे विकला़ त्यातून त्यांना १२,५६० रुपये एकरी उत्पन्न मिळाले आहे़
त्यामुळे आता त्यांना संपूर्ण वर्ष कसे काढायचे याची चिंता आहे़ त्यातच उधारीवर घेतलेल्या ठिबकचे पैसे देणे आवश्यक असल्यामुळे ते फेडण्यासाठी नगदी घेतलेले ५ एकरचे ठिबकही विकावे लागले़ अन्यथा हेच ठिबक त्यांना अजून किमान ५ ते १० वर्ष टिकले असते़ मात्र उधारी फेडण्यासाठी तुळशीराम यांना ठिबक विकावे लागल्याने त्यांचे उत्पादन अजूनच घटणार आहे़
तरीही तुळशीराम यांना आत्मविश्वास
४निसर्गाची साथ नाही, सरकारची मदत नाही, तरीही तुळशीराम म्हणतात, मदत नको, कर्जमाफीही नको, फक्त माझ्या शेतात माल होऊ द्या व त्याला भाव मिळू द्या, मग गरज नाही शेतकºयाला कशाचीच़
४अशी प्रामाणिक भूमिका त्यांनी पोटतिडकीने मांडली़तुळशीराम यांच्या घरात पत्नी दोन मुले व आई असा परिवार आहे़
४संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर असलेल्या तुळशीरामाला ताठ मानेने जगणे मात्र महत्त्वाचे वाटते, त्यामुळे ठिबक विकून का होईना, मात्र उधारीचे पैसे त्यांनी देण्याचा निर्णय घेतला़
गुलाबी बोंडअळीमुळे नुकसान कमीच की काय म्हणून, तुळशीराम गायकवाड यांनी एकरभर लावलेल्या ज्वारीला मर लागली, जी काय वाढली तिलाही कणीसचं लागले नाही़ ती अजूनही शेतातच पडून आहे़ त्यामुळे गायकवाड यांचे संपूर्ण गणित बिघडले आहे़
‘आम्हाले कर्जमाफी नको अन् कोणतीही सरकारच्या मदतची भिक नको’ फक्त आमच्या शेतात माल पिकला पाहिजे अन् तेले हिशेबात भाव भेट्याले पाहिजे’़ उधारी देणं बाकी हे़
-तुळशीराम गायकवाड, भानखेडा, ता़ बोदवड़
http://www.lokmat.com/yavatmal/pink-bond-slowly-farmers-havoc/