कार्यक्रमात उपसभापती सुनील पाटील, माजी सभापती संजय पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भाऊसाहेब खंडू जाधव, पंचायत समितीचे माजी सदस्य कारभारी पवार, जिभाऊ पाटील, सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक अविनाश करपे, पाटणा सरपंच नितीन चौधरी, आदी उपस्थित होते.
यावेळी रोहिदास सोनवणे, सुरेश गायकवाड, अनिल गायकवाड, विजय गायकवाड, धरमसिंग पवार या पाच लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात त्यांच्या हक्काच्या घराच्या चावीची प्रतिकृती खासदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली. यावेळी राज्य सरकारच्या ऑनलाईन कार्यक्रमाचा लाभदेखील उपस्थित लाभार्थ्यांना घेतला. गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी प्रास्ताविक केले.
केंद्र आणि राज्याच्या योजनेतून चाळीसगाव तालुक्यात सहा हजारपेक्षा जास्त घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यापैकी ४ हजार २३५ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. अधिकाऱ्यांनी तांत्रिक गोष्टींची पूर्तता करण्यासाठी मदत करण्याची गरज असून, लाभार्थ्यांनीदेखील आपल्याला मिळालेला पैसा हा घर बांधताना शौचालयदेखील बांधून १०० टक्के उपभोग घ्यावा. लाभ मिळवून देण्यासाठी सर्व उपस्थितांनी ग्रामीण योजनांचा दूत बनून गोरगरीब जनतेला मदत व सहकार्य करावे, अशी अपेक्षा खासदार पाटील यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी अजित पवार, किरण माला जंगम, मनोहर गांगुर्डे, विस्तार अधिकारी आर. आर. पाटील, के. एन. माळी, दिगंबर शिर्के, माजी सरपंच गोरख राठोड, राजूभाऊ पगार, बंडूदादा पगार, बबडी शेख, माजी सरपंच अभिमन्यू शास्त्री, नरेंद्र जैन, माजी सरपंच रवी राजपूत, समकित छाजेड, राकेश कोतकर, कैलास गावडे उपस्थित होते.
===Photopath===
170621\17jal_4_17062021_12.jpg
===Caption===
चाळीसगाव तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना घराची चावी देताना खासदार उन्मेश पाटील. सोबत संजय पाटील, सुनील पाटील, भाऊसाहेब जाधव व इतर.