जळगाव : अनलॉक प्रक्रियेदरम्यान हॉटेल, उपहारगृहांना परवानगी देण्यात आली असली तेथे केवळ पार्सल सुविधाच सुरू असून नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा ईशारा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिला आहे.राज्य सरकारने निर्गमित केलेल्या नियमावलीनुसार हॉटेल, उपहारगृह सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र ही परवानगी देताना या ठिकाणी बसून जेवण करता येणार नसून केवळ पार्सल सुविधेचीच परवानगी आहे.या संदर्भात प्रशासनाच्यावतीने वेळोवळी तपासणी करण्यात येत आहे. असे असले तरी गेल्या काही दिवसांपासून हॉटेल सुरू झाले असून खवय्यांसाठी आनंदाची बातमी असल्याचे संदेश फिरत आहेत. मात्र परवानगी केवळ पार्सल सुविधेची असल्याने जिल्ह्यातील नागरिक, हॉटेल, उपहारगृह चालक, मालक यांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नियमांचे पालन न केल्यास तसेच अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा ईशाराही जिल्हाधिकारी राऊत यांनी दिला आहे.
खवय्यांनो, हॉटेलमध्ये बसण्यापूर्वी नियम वाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2020 12:00 PM