चंद्रदर्शन न झाल्याने उद्या ईद साजरी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:16 AM2021-05-13T04:16:53+5:302021-05-13T04:16:53+5:30
इदगह ट्रस्टचे अध्यक्ष गफ्फार मलिक यांनी प्रस्तावना सादर केली. सचिव फारुक शेख यांनी आढावा सादर केला. मौलाना नासिर ...
इदगह ट्रस्टचे अध्यक्ष गफ्फार मलिक यांनी प्रस्तावना सादर केली. सचिव फारुक शेख यांनी आढावा सादर केला. मौलाना नासिर यांनी ईदच्या चंद्राचे महत्त्व विशद केले. मौलाना उस्मान यांनी कुराणच्या माध्यमातून ईद व चाँदबाबत माहिती दिली. या सभेत जळगाव शहरातील मशिदीचे इमाम व उलमा तसेच ट्रस्टी यांची उपस्थिती होती.
इन्फो :
नमाज घरी अदा करण्याचे आवाहन
शासनाच्या आदेशानुसार मुस्लिम समाज बांधवांनी ईदची नमाज आपआपल्या घरी अदा करावी व शासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन समितीमार्फत करण्यात आलेले आहे. यावेळी
मौलाना नसीर, मुफ्ती इम्रान, मौलाना रेहान, मौलाना वसीम, मौलाना शफी, मौलाना अब्दुल रहीम, कारी झाकीर, मौलाना कोनेन, मौलाना असरार, तसेच ईदगाह ट्रस्टचे सैयद चाँद, अश्फाक बागवान, ताहेर शेख, अनिस शाह, मुकिम शेख, मुश्ताक अली उपस्थित होते.