आठव्या दिवशी १५०० विद्यार्थ्यांनी दिली ऑफलाईन परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 09:47 PM2020-10-19T21:47:07+5:302020-10-19T21:47:24+5:30

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवी, पदविका व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्ष/अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या आठव्या ...

On the eighth day, 1500 students took the offline exam | आठव्या दिवशी १५०० विद्यार्थ्यांनी दिली ऑफलाईन परीक्षा

आठव्या दिवशी १५०० विद्यार्थ्यांनी दिली ऑफलाईन परीक्षा

Next

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवी, पदविका व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्ष/अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या आठव्या दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत ९५ टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली. सायंकाळी उशिरापर्यंत परीक्षा सुरु होत्या.

विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा १२ ऑक्टोबर पासून सुरू झाल्या आहेत. सोमवारी परीक्षेचा आठवा दिवस होता. आज विविध विद्याशाखांच्या १९८ विषयांच्या परीक्षा होत्या. सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत झालेल्या परीक्षांच्या विविध सत्रात १२ हजार १० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा यशस्वीपणे दिली तर या सत्रात १५०० विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा दिली. सायंकाळी उशिरापर्यंत परीक्षा सुरु होती. अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी. पाटील यांनी दिली.

Web Title: On the eighth day, 1500 students took the offline exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.