भुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील साकेगाव येथे वीज वितरण कंपनीकडून हुकूमशाही पद्धतीने वीज कनेक्शन कट करण्याची मोहीम राबवली जात आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता नियमित वीज भरणाºयाचेही वीज कनेक्शन कट करण्यात येत आहे. यामुळे वीज बिल भरणा करणाºया ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, हुकूमशाही पद्धतीने कामकाज करण्यात येत असल्याचा संताप व्यक्त होत आहे.वीज वितरण कंपनीने २० मेपासून गावातील वीज ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना व कल्पना न देता वीज कनेक्शन कट करण्यात येत आहे. एकाही महिन्याचे वीज बिल थकलेले असले, ग्राहक लग्न कार्यानिमित्त, दवाखान्यानिमित्त, शेती कामानिमित्त बाहेर गेल्यावर ग्राहकाच्या अनुपस्थित कोणतीही पूर्वसूचना न देता वीज कनेक्शन कट करण्यात येत आहे. नियमित वीजबिल भरत असतानाही एखाद्या वेळेस जर चुकून उशिराने बिल भरले गेल्याने हुकूमशाही पद्धतीने वीज कनेक्शन करण्याची धडक मोहीम वीज वितरण कंपनीकडून करण्यात येत आहे.वीज कनेक्शन कट करण्यासाठी आठ कर्मचाºयांची नियुक्तीगावातील सुमारे दोन हजार वीस बिल भरणा करणाºया ग्राहकांमधील जे थकीत वीज बिलधारक आहे त्यांच्याकडून वीज बिल भरणा न केल्यामुळे आठ कर्मचाºयांचे पथक तयार करण्यात आला आहे. एका कर्मचाºयास दररोज पाच वीज कनेक्शन कट करण्याचे आदेश देण्यात आले आहे.कट केलेले कनेक्शन जोडण्यासाठी १८० रुपये दंड आकारणीगावातील अनेक वीज ग्राहकांनी आॅनलाइन पद्धतीने वीज भरणा केला आहे. याची अपडेट सर्वर डाऊन असल्यामुळे, अपडेट झाले नाही. यामुळे याचा फटका ग्राहकांना बसत आहे. वीज बिलाची नोंद नसल्यामुळे वीज कनेक्शन कट करण्यात येत आहे. ग्राहकाने त्यांना याचे पुरावे दिले, भरणा केल्याचे मेसेज दाखवल्यानंतरही वीज कनेक्शन कट करण्यात आले असल्याच्या अनेकांच्या गावातून तक्रारी आहेत. तसेच कट केलेले वीज कनेक्शन पुन्हा जोडणी करण्यासाठी १८० रुपये पुन्हा वीज कनेक्शन जोडण्यासाठी मोजावे लागत आहेत.कर्मचारी कोंडीतवरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचे पालन करण्यासाठी कर्मचारी भर उन्हामध्ये फिरून कर्तव्य पार पाडत आहेत. याच वेळेस इच्छा नसतानाही वीज कनेक्शन कट करावे लागत आहे. याचा पूर्ण रोष ग्रामस्थांकडून कर्मचाºयांवर काढला जात आहे. यामुळे एकीकडे वरिष्ठांच्या आदेशाचे पालन अन् दुसरीकडे इच्छा नसताना वीज कनेक्शन कट करावे लागते. अशी कर्मचाºयांची मात्र कोंडी होत आहे.अव्वाच्या सव्वा बिलेउन्हाळ्याच्या सुट्ट्यानिमित्त अनेक मंडळी मामाच्या गावी, बाहेरगावी गेलेली आहेत. दीड-दोन महिन्यांपासून अनेकांनी विजेचा वापर न करतासुद्धा रीडिंग घेणाºया व्यक्ती चुकीच्या पद्धतीने रीडिंग घेऊन जात आहेत. अनेक वेळा आलेले बिल व रीडिंग याचा ताळमेळ बसत नाही. विजेचा वापर नसताना फक्त रेंटल ९० रुपये बिल येणे अपेक्षित असताना आठशे ते हजारच्या घरांमध्ये वीज बिल येत असताना वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे वीज बिल भरण्यास अगदी दोन दिवस उशीर झाल्यावरही वीज कनेक्शन कट करणे व दुसरीकडे वीज वापर नसतानाही हजारो रुपयांचे बिल पाठवणे पूर्णत: भोंगळ कारभार सुरू असल्याच्या जनसामान्यांच्या प्रतिक्रिया गावातून उमटत आहेत.वरिष्ठांकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार, आदेशानुसार काम करावे लागते.-डी.आर.कोल्हे, सहाय्यक अभियंता, वीज उपकेंद्र, साकेगाव, ता.भुसावळ
साकेगावात नियमित वीज भरणा करणाऱ्यांचेही वीज कनेक्शन केले कट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 4:23 PM
कोणतीही पूर्वसूचना न देता नियमित वीज भरणाºयाचेही वीज कनेक्शन कट करण्यात येत आहे. यामुळे वीज बिल भरणा करणाºया ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
ठळक मुद्देसाकेगावात वीज वितरण कंपनीची हुकूमशाहीवीज कनेक्शन कट करण्यासाठी आठ कर्मचाऱ्यांची नियुक्तीकर्मचारी कोंडीतअव्वाच्या सव्वा बिले