नवीन बॅरिकेड्स दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:17 AM2021-02-11T04:17:34+5:302021-02-11T04:17:34+5:30
फोटो १० सीटीआर ४२ रिकव्हरी रेट होतोय कमी जळगाव : गेल्या दोन दिवसांपासून बरे होणाऱ्यांपेक्षा नवीन रुग्णांची संख्या अधिक ...
फोटो १० सीटीआर ४२
रिकव्हरी रेट होतोय कमी
जळगाव : गेल्या दोन दिवसांपासून बरे होणाऱ्यांपेक्षा नवीन रुग्णांची संख्या अधिक येत असल्याने जिल्ह्याचा रिकव्हरी रेट काही अंशांनी कमी झाला आहे. ९७.१० टक्क्यांवरील हा रिकव्हरी रेट मंगळवारी ९७.०२ टक्के नोंदविण्यात आला आहे. मंगळवारी ३५ नवे रुग्ण आढळले तर १४ जण कोरोनातून बरे झाले.
सुरळीत सेवेचे आव्हान
जळगाव : दिव्यांग प्रमाणपत्रांसाठी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकमेव केंद्र असल्याने दर बुधवारी या ठिकाणी प्रचंड गर्दी होत असते. याचे नियोजन करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. काही सेवांचे विकेंद्रीकरण करण्याची मागणी असताना याबाबत जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून निर्णय होत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत.
लसीकरणाची संख्या घटली
जळगाव : नियमित लस घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. यात पाचोरा येथे मंगळवारी एका दिवसात केवळ ७ जणांनी लस घेतली, तर जामनेर येथे ९ जणांनी लस घेतली. गेल्या दोन दिवसांत एकाही कर्मचाऱ्याला रिॲक्शन आलेली नाही. जीएमसीतही मंगळवारी अगदी कमी संख्या नोंदविण्यात आली. केवळ २३ जणांनी या ठिकाणी लस घेतली.