एरंडोलला ३७ टक्के विद्यार्थ्याकडे ॲंड्रॉईड मोबाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2020 11:16 PM2020-11-01T23:16:22+5:302020-11-01T23:19:48+5:30

जिल्हा परिषद व प्रकल्प एज्युकेशन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने "शाळेबाहेरची शाळा" हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

Erandol has 37% students with Android mobile | एरंडोलला ३७ टक्के विद्यार्थ्याकडे ॲंड्रॉईड मोबाईल

एरंडोलला ३७ टक्के विद्यार्थ्याकडे ॲंड्रॉईड मोबाईल

Next
ठळक मुद्दे शाळा बाहेरील शाळा उपक्रमविद्यार्थ्यांचा शंभर टक्के सहभाग करण्याचा निर्धार

एरंडोल : तालुक्यात जिल्हा परिषद व प्रकल्प एज्युकेशन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने "शाळेबाहेरची शाळा" हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात अजून तीन हजार ५२२ विद्यार्थी सहभागी झालेले नाहीत. लवकरच १०० टक्के विद्यार्थी सहभागी होण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी व्ही.एच.पाटील यांनी दिली. दरम्यान, तालुक्यातील ३७.६० टक्के विद्यार्थ्याकडे ॲंड्रॉईड मोबाईल आहे.
एरंडोल तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण ८४ शाळा आहेत. सर्व शाळांमध्ये हा उपक्रम सुरू आहे. प्राथमिक शिक्षक संख्या ३६४ असून १०० टक्के शिक्षकांनी त्यांच्या मोबाईलमध्ये ॲप्स डाऊनलोड केले आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये नऊ हजार ८५३ विद्यार्थी शिकत आहे. त्यापैकी तीन हजार ७०५ विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड अर्थात ३७.६० टक्के विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल आहेत. तालुक्यात ४२६ विद्यार्थ्यांकडे रेडीओ आहेत इतर विद्यार्थ्यांकडे प्रत्येक शाळेत स्वतः शिक्षक जाऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या मोबाईलमधून हा कार्यक्रम ऐकवतात. ३० ते ३५ मिनिटांचा हा कार्यक्रम आहे. २७ ऑक्टोबर ते २९ डिसेंबर या काळात तालुक्यातील १४ अधिकाऱ्यांनी शाळांना भेटी देऊन केली आहे. पडताळणी केली आहे. प्रत्यक्ष मुलांना ऑनलाइन चाचणी सोडविण्यास सांगितले आहे.

आतापर्यंत एक हजार ५७९ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन चाचणी दिली आहे. या आठवड्यात चार ते पाच हजार विद्यार्थी ऑनलाइन चाचणी देण्याचे नियोजन आहे. या उपक्रमात नऊ हजार ८५३ विद्यार्थ्यांपैकी सहा हजार ३३१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. लवकरच १०० टक्के विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतील, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी व्ही.एच.पाटील यांनी दिली.
 

Web Title: Erandol has 37% students with Android mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.