बर्ड फ्ल्यू प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय सनियंत्रण कक्ष स्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:15 AM2021-01-17T04:15:18+5:302021-01-17T04:15:18+5:30
जिल्ह्यात शीघ्र कृती दलाचे ३० पथक स्थापन करण्यात आले असून त्यांना आवश्यक प्रशिक्षणही देण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील ...
जिल्ह्यात शीघ्र कृती दलाचे ३० पथक स्थापन करण्यात आले असून त्यांना आवश्यक प्रशिक्षणही देण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील पोल्ट्रीफार्मला क्षेत्रीयस्तरावरील अधिकारी भेटी देवून मालकांना जैविक सुरक्षेबाबत मार्गदर्शन करीत आहे. पक्षी मालकांनी आपल्या कुक्कुट पक्षाचा स्थलांतरीत पक्षाशी संपर्क टाळावा, कुक्कुट पक्षात काही बाबी आढळल्यास त्वरीत जिल्हास्तरीय किंवा तालुकास्तरीय नियंत्रण कक्षाशी संपर्क करावा, असे आवाहनही पाटील यांनी केले.
पूर्ण शिजवलेले चिकन व उकडलेली अंडी खाणे पूर्णत: सुरक्षित असून बर्ड फ्ल्यू आजार पक्षांपासून थेट माणसांना होण्याची शक्यता फारच कमी असल्याचे सांगण्यात आले. बर्ड फ्ल्युबाबत नागरिकांनी भीती बाळगू नये असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊन, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. ए. डी. पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अविनाश इंगळे यांनी केले आहे.
आपत्कालीन परिस्थितीसाठी लागणारे पीपीई किट, सॅनिटाईझर, मास्क, ग्लोज आदी साहित्य जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून प्राप्त झाले असून जिल्ह्यात कुठलीही अशी परिस्थिती हाताळण्यासाठी पशुसंवर्धन विभाग सज्ज असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अविनाश इंगळे यांनी सांगितले.