जळगावात गणरायाची जल्लोषात स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 01:55 PM2017-08-25T13:55:59+5:302017-08-25T13:56:56+5:30
मिरवणुकांमध्ये जल्लोष
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 25 - ढोल-ताशांचा गजर, ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष अशा चैतन्य व मंगलमय वातावरणात जळगावात शुक्रवारी लाडक्या गणरायाचे आगमन झाले. बाप्पाच्या आगमनामुळे भक्तांच्या चेह:यावर अपूर्व उत्साह आहे. सकाळपासूनच शहरात मिरवणुका सुरू झाल्या . पवित्र मंत्रोच्चारात विधीवत पूजा-अर्चा केल्यानंतर गणरायाची स्थापना करण्यात आली.
ढोल-ताशांचा दणदणाट
गणरायाच्या मिरवणुकीत ढोल व ताशांचा प्रचंड दणदणाट केला जात होता. सार्वजनिक गणेश मंडळांचे कार्यकर्ते ढोल-ताशांच्या तालावर थिरकत होते. जस-जसा ढोल व ताशांचा गजर वाढत होता; तस-तसा कार्यकत्र्याचा उत्साह व आनंद द्विगुणित होत होता. मिरवणुकांमध्ये अबालवृद्धांनी सहभाग नोंदवला. बाप्पाच्या आगमनामुळे बालगोपाळांमध्येही आनंदाचे वातावरण होते. मिरवणुकांमध्ये सहभागी झालेल्या काहींनी कपाळाला तर काहींनी हाताच्या मनगटाला भगव्या रंगाच्या ‘गणपती बाप्पा मोरया’ लिहिलेल्या पट्टय़ा बांधल्या होत्या. घरात प्रतिष्ठापनेसाठी गणेशमूर्तीची खरेदी केल्यानंतर लगेच तेथूनच बाप्पाची सवाद्य मिरवणूक काढली जात होती. तर मोठय़ा सार्वजनिक गणेश मंडळांनी टप्प्याटप्प्याने मिरवणुका काढल्या.
गेल्या महिनाभरापासून गणेशभक्तांना लागलेली गणपती बाप्पाच्या आगमनाची ओढ अखेर शुक्रवारी पूर्ण झाली. गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर घराघरात तसेच लहान-मोठय़ा सार्वजनिक गणेश मंडळांकडून गणरायाची स्थापना करण्यात आली.
गणरायाच्या मिरवणुकीत यंदा लहान व मोठय़ा सार्वजनिक गणेश मंडळांकडून डॉल्बी, ब्रास बॅँड व डीजे अशा कर्णकर्कश व जीवघेण्या वाजंत्रीऐवजी ढोल-ताशे, झांज अशा पारंपरिक वाद्यांना पसंती देण्यात आली होती. पारंपरिक वाद्यांनी शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.
गणरायाच्या आगमनामुळे बाजारपेठेत नवचैतन्य संचारले होते. गणेशमूर्ती, पूजेचे साहित्य, पेढे व मिठाई खरेदीसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी बाजारपेठेत झाली होती. ङोंडू व गुलाबाची फुले, केळीची पाने व खांब, श्रीफळ, विडयाच्या पानांच्या खरेदीलाही चांगला प्रतिसाद होता. त्यामुळे मोठी आर्थिक उलाढाल झाली.
गणपतीच्या प्रतिष्ठापनेनंतर प्रसादासाठी पेढे व मिठाई लागते. त्यामुळे 24 ऑगस्टपासूनच पेढे व मिठाई व माव्याच्या मोदकांच्या मागणीत दुपटीने वाढ झाली. सकाळपासून स्वीट मार्टच्या दुकानांवर पेढे व मिठाई खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. गावराणी तुप व बुंदीच्या लाडूंनाही विशेष मागणी होती, असे विक्रेत्यांनी सांगितले.