तालुक्यात समाधानकारक पाऊस असल्याने शेतकरी खूश आहे. पिकांची स्थितीदेखील समाधानकारक आहे.
गेल्या आठवड्यात तालुक्यात दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने कोरोनाविषयी घबराटीचे वातावरण दिसून येते. परंतु नागरिक याबाबत बिनधास्त आहेत. मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळणे, या गोष्टी मात्र दिसून येत नाहीत. तिसऱ्या लाटेबाबत अजूनही धास्ती कायम आहे. आरोग्य विभाग मात्र तिसरी लाट थोपविण्यासाठी सर्व प्रकारची उपाययोजना करीत आहे. कोरोनामुळे शहरी शाळा अद्याप सुरू नसल्याने शिक्षक, पालक, विद्यार्थी यांना शाळा कधी सुरू होतील, याची उत्कंठा लागली आहे.
पालिका निवडणुकीचे पडघम वाजल्याने शहरात पालिकेबाबत राजकीय समीकरणे जुळविण्यास सुरुवात झाली आहे. जे एकमेकांचे कट्टरविरोधक आहेत. ते पालिकेच्या निवडणुकीसाठी एकत्रित आल्यास शहरवासीयांना आश्चर्य वाटू नये. वाॅर्ड पद्धत निवडणुकीसाठी असल्याने त्यासाठी वाॅर्ड रचनेच्या कामालादेखील लवकर सुरुवात होणार असल्याचे संकेत पालिका प्रशासनाने दिले आहेत. तसेच जिल्हा बँकेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तालुक्यातून तीन सदस्य हे जिल्हा बँकेवर संचालक आहेत. ती संख्या तेवढीच राहते की, त्यात वाढ होते. याकडेही तालुकावासीयांचे लक्ष आहे.