ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 24 - कुटुंबांसह बाहेरगावी गेलेल्या दोन निवृत्त पोलीस कर्मचा:यांच्या घरी चोरीचा प्रयत्न करुन चोरटय़ांनी पोलीस दलाला आव्हान दिले आह़े ही घटना खोटेनगर परिसरातील मयूर कॉलनीमध्ये घडली. दोन्ही ठिकाणी कुलूप तोडून चोरटय़ांनी घरात प्रवेश केला व लाकडी, लोखंडी कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकला़ मात्र दोन्हीही घरांमध्ये हाती काहीच न लागल्याने चोरटय़ांना रिकामे हाते परताव़ेमयूर कॉलनी परिसरात भालचंद्र ठाकूर हे पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यालयीन अधीक्षक पदावरुन सेवानिवृत्त झाले आहेत़ पत्नी, मुलगा सून नावतंडे या परिसरासह ते वास्तव्यास आहेत़ दिवाळीनिमित्त ते कुटुंबांसह धुळे येथील मुलाकडे गेले होत़े यादरम्यान चोरटय़ांनी लाकडी दरवाजाचे कुलूप न उघडल्याने कोयंडा तोडून घरात प्रवेश केला़ खोली लोखंडी कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकला़ देव्हा:यातील फोटो व साहित्य अस्ताव्यस्त फेकले होत़े समोरील रहिवासी प्राध्यापकांनी ठाकूर यांना फोनवरुन प्रकार कळविला़ यानंतर त्यांनी जळगाव गाठल़े घरात कुठल्याही प्रकारची रोकड किंवा दागिणे नव्हत़े त्यामुळे काहीही चोरी न झाल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दिली नाही़ दरम्यान माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अशोक रत्नपारखी यांच्यासह कर्मचा:यांनी ठाकूर यांच्याकडे पाहणी केली़याच कॉलनीत स्थानिक गुन्हे शाखेतून सेवानिवृत्त झालेले किरण पाटील हे पत्नीसह राहतात़ ते दोन दिवसांपूर्वी एरंडोल येथील शिक्षक असलेल्या मुलाकडे गेले होत़े त्यांच्या समोरील लाकडी दरवाजाचे कुलूप तोडून चोरटय़ांनी घरात प्रवेश केला़ लाकडी कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकला़ मात्र घरात कुठलीही रोकड किंवा दागिणे नसल्याने चोरटय़ाच्या हातात काहीच लागले नाही़