राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजमधील प्रवेशासाठी ५ जूनला परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:17 AM2021-04-27T04:17:03+5:302021-04-27T04:17:03+5:30
जळगाव : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे डेहराडून येथील राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजसाठी (आरआयएमसी) महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश पात्रता परीक्षा घेण्यात ...
जळगाव : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे डेहराडून येथील राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजसाठी (आरआयएमसी) महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश पात्रता परीक्षा घेण्यात येणार आहे. ही प्रवेश परीक्षा पाच जून रोजी आयोजित करण्यात आली आहे.
परीक्षेसाठी एक जानेवारी रोजी ११ वर्षे सहा महिन्यांहून अधिक वय असलेले व १३ वर्षांपेक्षा अधिक वय नसलेले विद्यार्थी पात्र आहेत. तसेच या परीक्षेसाठी १५ एप्रिलपर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यामुळे अनेकांना अर्ज पाठविता आले नाही. यामुळे आता ३० एप्रिलपर्यंत अर्ज पाठविता येणार आहेत. अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली असून पूर्ण भरलेला अर्ज दोन प्रतींत आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, १७, डॉ. आंबेडकर मार्ग, लाल देवळाजवळ, पुणे या पत्त्यावर पाठवावा. सोबत जन्मतारीख, जातीचा दाखला, अधिवास दाखल्याची प्रत व शाळेचे बोनाफाइड सर्टिफिकेट जोडणे आवश्यक आहे.