लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : तालुक्यातील आव्हाणे येथील ग्रामपंचायतीत माजी सरपंच विजय दत्तात्रय पाटील यांचे अस्तित्व पणाला लागले आहे. आव्हाणे ग्रामपंचायतीच्या १३ पैकी ४ जागा बिनविरोध झाल्या असून, नऊ जागांसाठी २० उमेदवार रिंगणात आहेत. सरळ-सरळ दोन पॅनलमध्ये ही लढत होत आहे. पंचायत समिती सभापती ॲड. हर्षल चौधरी यांच्या विरोधात कैलास शिंदे यांच्या पॅनलमध्ये समोरासमोर लढत आहे. माजी सरपंच विजय पाटील हे हर्षल चौधरी यांच्या पॅनलकडून निवडणूक रिंगणात असून, विजय पाटील यांच्या विरोधात राजेंद्र पाटील यांनी आव्हान उभे केले आहे. यासह बाजार समितीचे संचालक लकी टेलर यांची बहीण संजूबाई पाटील यादेखील निवडणुकीच्या रिंगणात असून, त्यांच्या विरोधात अंबरनाथचे नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्या काकू यमुनाबाई चौधरी यांनी आव्हान उभे केले आहे. या लढतीकडे पंचक्रोशीचे लक्ष लागले आहे.
अशा आहेत लढती
प्रभाग क्रमांक १
यमुनाबाई चौधरी-संजूबाई पाटील
संजूबाई पाटील-सिंधूबाई पाटील
प्रभाग क्रमांक २
विजय पाटील-राजेंद्र पाटील
शोभाबाई चौधरी-मनीषा पाटील
प्रभाग ३
विशाल नन्नवरे-कालिदास सपकाळे
सुरेश सपकाळे-संजय सपकाळे
सविता सपकाळे-उषाबाई सुरवाडे
प्रभाग ५
सुनील सोनवणे-इघन मोरे
संगीताबाई चौधरी- भारती पाटील
दीपाली भोई-सरला ढोले