गौण खनिजच्या १४ लाखांच्या पावत्या बनावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:18 AM2021-07-14T04:18:54+5:302021-07-14T04:18:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा परिषदेच्या मालकीच्या पाझर तलावामधून गौण खनिज उत्खनन करून यात लाखो रुपयांचा गैरव्यवहार ...

Fake receipts of Rs 14 lakh for secondary minerals | गौण खनिजच्या १४ लाखांच्या पावत्या बनावट

गौण खनिजच्या १४ लाखांच्या पावत्या बनावट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्हा परिषदेच्या मालकीच्या पाझर तलावामधून गौण खनिज उत्खनन करून यात लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप जि. प. सदस्या पल्लवी सावकारे यांनी केला असून, त्यांनी याबाबत लघुसिंचन विभागाकडे माहिती मागितली होती. त्यानुसार आता १४ लाखांच्या पावत्या या बनावट असल्याचे यात आढळून आल्याची माहिती त्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.

गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून यासंदर्भात कागदपत्रांची मागणी करूनही विभागाकडून टाळाटाळ करण्यात आली. यात नियुक्त चौकशी समितीने अहवाल दिला आहे. शिवाय या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेकडूनही चौकशी सुरू असून, यात ४५ लाखांपर्यंत गैरव्यवहार झाल्याची शक्यता सदस्या सावकारे यांनी काही दिवसांपूर्वी वर्तविली होती. याबाबत त्यांनी वारंवार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडेही निवेदन दिले होते. दरम्यान, त्यांना ९३ पैकी ९१ कामांची माहिती मिळाली आहे. यात नांद्रा येथी ४३ पावत्या तर शिंदखेडा, जि. धुळे येथील ५७ पावत्या या बनावट असल्याचे समोर येत आहे. यावर बनावट शिक्के मारण्यात आले असून, यावरील क्यूआरकोडही स्कॅन होत नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

पुरावेच बनावट असल्याची माहिती

लघुसिंचन विभागाचे कनिष्ठ अभियंता राधेश्याम सोनवणे यांनी काही जानेवारी महिन्यात याबाबत दिलेल्या अहवालात त्यांनी खनिकर्म विभागाची काही पत्र जोडली असून, आपण चौकशी केल्याचे म्हटले आहे. मात्र, त्यांनी जोडलेली पत्रे ही जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यातच आली नसल्याचे उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांनी स्पष्ट केले असून, तसे पत्र दिले असल्याने पुरावेच बनावट असल्याची माहितीही पल्लवी सावकारे यांनी दिली आहे.

Web Title: Fake receipts of Rs 14 lakh for secondary minerals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.