कासोदा, ता.एरंडोल, जि.जळगाव : येथे फक्त एका दिवसाचे नील गायीचे पिल्लू शेतात उड्या मारत असताना अचानक पाच-सहा कुत्री या पिल्लाच्या दिशेने धावताना लक्षात आल्याने तेथेच काम करीत असलेल्या शेतकºयाने कुत्र्यांना हाकलून या पिल्लाला पकडले. नंतर एरंडोलच्या वनपालाकडे सुरक्षित सुपूर्द केले आहे.कासोदा येथून जवळच असलेल्या वनकोठे शिवारातील आपल्या गट क्रमांक ६२/१ मध्ये कासोद्याचे गुलाब भगवान पाटील हे शेतकरी ठिबक नळ्या गोळा करीत होते. अचानक तेथून नील गायीचे पिल्लू पळून गेले. पुढे त्या पिल्लाच्या दिशेने शेतातील पाच-सहा कुत्री धावली, पण प्रसंगावधान राखून हा शेतकरी कुत्र्यांच्या दिशेने धावला व त्यांना हाकलले. नंतर हे हरणाचे पिल्लू समजून त्याला पकडून पाणी व दूध पाजले.एरंडोलच्या वनपालांशी संपर्क साधून हे पिल्लू सुरक्षितपणे त्यांच्या स्वाधीन केले आहे. या परिसरात १४/१५ नील गायींंचा कळप रात्री फिरत असल्याची माहिती काही शेतकऱ्यांनी दिली आहे. रात्री त्यातील एक गाय व्याली असेल, पण पिल्लाला त्यावेळी पळता येत नसल्याने ते येथेच राहून गेले असावे, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. परंतु ते रात्रभर सुरक्षित राहिले याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.हे पिल्लू हरणाचे नसून नील गायीचे आहे. पायाच्या खुर वरून ही ओळख पटते. त्याला सुमारे १५/२० दिवस दूध पाजून सांभाळावे लागेल. त्याला चांगली समज आल्यानंतर नील गायींच्या कळपात सोडावे लागेल.-सुनील पाटील, वनपाल, पद्मालय वनविभाग, एरंडोल
शेतकऱ्याने कुत्र्याच्या हल्ल्यातून वाचवले नील गायीच्या पिल्लाचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2019 5:10 PM
एका दिवसाचे नील गायीचे पिल्लू शेतात उड्या मारत असताना अचानक पाच-सहा कुत्री या पिल्लाच्या दिशेने धावताना लक्षात आल्याने तेथेच काम करीत असलेल्या शेतकºयाने कुत्र्यांना हाकलून या पिल्लाला पकडले. नंतर एरंडोलच्या वनपालाकडे सुरक्षित सुपूर्द केले आहे.
ठळक मुद्देकासोदा : वनपालाकडे सोपवले१५-२० दिवसांनंतर सोडणार कळपात