पारोळा तालुक्यातील कोळपिंप्री येथे शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 06:00 PM2020-02-20T18:00:52+5:302020-02-20T18:02:11+5:30

कोळपिंप्री येथे बन्सीलाल भोगीलाल पाटील (काटे) या कर्जबाजारी शेतकºयाने आत्महत्या केली.

Farmer's suicide at Kolpimpri in Parola taluka | पारोळा तालुक्यातील कोळपिंप्री येथे शेतकऱ्याची आत्महत्या

पारोळा तालुक्यातील कोळपिंप्री येथे शेतकऱ्याची आत्महत्या

googlenewsNext
ठळक मुद्देवि.का.संस्थेचे होते कर्जआठवड्यापासून ते होते बेपत्ता

पारोळा, जि.जळगाव : तालुक्यातील कोळपिंप्री येथे बन्सीलाल भोगीलाल पाटील (काटे) (वय ५३) या कर्जबाजारी शेतकºयाने विषारी द्रव सेवन करून आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी आठला ही घटना उघडकीस आली.
गेल्या आठवडाभरापासून ते बेपत्ता झाले होते. घरातून शेतात फवारणीसाठी जातो, असे सांगून गेले होते. मात्र त्यांचा शोध घेतला असता ते आढळून आले नाही. गुरुवारी सकाळी आठला त्यांच्या शेताजवळील पंडित हनुमंत काटे यांच्या शेतात ते मृतावस्थेत आढळून आले. त्यांच्यावर सोसायटीचे ४५ हजार रुपये तर हातउसनवारीचे पन्नास हजार रुपये कर्ज होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना नैराश्य आले होते. हवालदार नाना पवार आणि विजय शिंदे यांनी पंचनामा केला. कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.चेतन महाजन, डॉ.बी.बी.राजहंस, भूषण पाटील यांनी शवविच्छेदन केले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडील भाऊ, वहिणी असा परिवार आहे. सायंकाळी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंजनविहिरे (ता.धरणगाव) शाळेचे कर्मचारी शांतीलाल काटे यांचे बंध,ू तर नंदलाल काटे यांचे वडील होत.
 

Web Title: Farmer's suicide at Kolpimpri in Parola taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.