धरणगाव, जि.जळगाव : या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा मका, ज्वारी, कापूस, सोयाबीन, बाजरी व इतर पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकºयांनी पीक विमा काढलेला होता नुकसान होऊन चार ते पाच महिने झाले तरी पिक विमा कंपनीकडून शेतकºयांना कुठलीही पीक विम्याची नुकसानीची रक्कम मिळालेली नाही. तरी नव्या सरकारने या विषयाकडे गांभिर्याने लक्ष देवून शेतकºयांना न्याय द्यावा अन्यथा शेतकºयांना कृती समिती रस्त्यावर उतरेल, असा इशारा देण्यात आला,यासंदर्भात धरणगाव तालुका शेतकरी कृती समितीतर्फे नायब तहसीलदार वाडीले यांना व तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी यांना निवेदन देवून मागणी करण्यात आली.याप्रसंगी शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष गोपाल पाटील, किशोर चौधरी, गरबड पाटील, कैलास मराठे, दगडू माळी, राजेंद्र पाटील, विजयसिंग पाटील, पुंडलिक महाजन, गोपाल चौधरी, महम्मद बागवान, प्रमोद पाटील, भूषण पाटील, किशोर पुरभे, गिरीश नारखेडे, मनोज चौधरी, मोरेश्वर भारोटे, दीपक पाटील, भावेश पाटील इत्यादी शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2020 2:51 PM
पिक विमा कंपनीकडून शेतकºयांना कुठलीही पीक विम्याची नुकसानीची रक्कम मिळालेली नाही. तरी नव्या सरकारने या विषयाकडे गांभिर्याने लक्ष देवून शेतकºयांना न्याय द्यावा अन्यथा शेतकºयांना कृती समिती रस्त्यावर उतरेल, असा इशारा देण्यात आला,
ठळक मुद्देरक्कम न दिल्यास रस्त्यावर उतरूशेतकरी कृती समितीचा इशारा