आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १० - नूतन मराठा महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर शुक्रवारी झालेल्या बारावीच्या अर्थशास्त्राच्या पेपर दरम्यान अर्धातास शिल्लक असताना पुरवणी न मिळाल्याने विद्यार्थिनी व पालकांनी पेपर संपल्यानंतर तीव्र संताप व्यक्त केला. दरम्यान, पेपरला दहा मिनीटे शिल्लक असताना पुरवणी देता येत नाही असा नियम असल्याची माहिती केंद्र संचालकांनी दिली.शुक्रवारी अर्थशास्त्र या विषयाचा पेपर सकाळी ११ ते २ वाजेदरम्यान होता. नूतन मराठा महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर एका इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्तर पत्रिका पूर्ण लिहून झाल्याने पुरवणीची मागणी केली. तेव्हा पेपर संपायला ३० ते ३५ मिनीटांचा अवधी शिल्लक होता. मात्र, पर्यवेक्षकांनी विद्यार्थ्यांना पुरवणी देण्यास नकार दिला. आग्रह केल्यानंतरही पर्यवेक्षकाने विद्यार्थ्यांना पुरवणी न दिल्याने २० ते २५ गुणांचा पेपर अर्धातास शिल्लक असतानाही लिहिता आला नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली. पेपर संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी याबाबत पालकांना माहिती दिली. पालकांनी थेट मुख्याध्यापक व इतर प्राध्यापकांकडे जावून याबाबत तक्रार केली.प्राचार्यांनी घातली समजूत‘त्या’ इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी याबाबत स्कूलच्या प्राचार्यांकडे तक्रार केल्यानंतर दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्या नूतन मराठा महाविद्यालयात पोहचल्या. झालेल्या प्रकाराबाबत विद्यार्थ्यांकडून माहिती घेतल्यानंतर केंद्र संचालक व पर्यवेक्षकांशी त्यांनी चर्चा केली.या चर्चेनंतर ज्या विद्यार्थ्यांना पुरवणी मिळाली नाही त्यांची नावे लिहून घेण्यात आली.मात्र, पालक व विद्यार्थी पर्यवेक्षकावर कारवाईच्या मागणीवर ठाम होते. प्राचार्यांनी पालक व विद्यार्थ्यांची समजूत घातल्यानंतर हा गोंधळ शांत झाला. मात्र एकूणच या प्रकारामुळे विद्यार्थी व पालकांना मनस्ताप सहन करावा लागला.पर्यवेक्षकावर कारवाई करा२० ते २५ विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी मुख्याध्यापकांच्या दालनात जावून विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याने पर्यवेक्षकावर कारवाईची मागणी केली. तसेच विद्यार्थ्यांच्या नुकसानीबाबत शिक्षणाधिकाºयांकडे व न्यायालयात जाण्याचा इशारा दिला. यावेळी अनेक विद्यार्थिनींना अश्रू अनावर झाले होते. २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या पेपर दरम्यान देखील विद्यार्थ्यांना पुरवणी मिळाली नसल्याची तक्रार पालकांनी केली. पेपर संपल्यानंतर सुमारे १ तास महाविद्यालयात गोंधळ सुरुच होता.प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या आवश्यकतेनुसार पुरवणी देण्यात आली. काही विद्यार्थ्यांनी पेपर संपायला अवघे १० मिनीटे शिल्लक असताना पुरवणीची मागणी केली. मात्र, नियमानुसार पेपर संपायला १० मिनीटे बाकी असताना पुरवणी देता नसल्याने त्या विद्यार्थ्यांना पुरवणी देण्यात आली नाही.-प्रा.एस.डी.सुर्वे, केंद्र संचालक
जळगावात बारावीच्या विद्यार्थ्यांना पुरवणी न मिळाल्याने तीव्र संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:24 PM
विद्यार्थिनींना अश्रू अनावर
ठळक मुद्देनूतन मराठा महाविद्यालयातील प्रकारप्राचार्यांनी घातली समजूत