जळगाव जिल्ह्यात ‘मैत्रेय’च्या अडीच हजार गुंतवणूकदारांची साडे पाच कोटी रुपयात फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 04:04 PM2018-02-12T16:04:38+5:302018-02-12T16:07:33+5:30

‘मैत्रेय’ने जिल्ह्यातील २ हजार ५५१ गुंतवणूकदारांची ५ कोटी ७६ लाख ६४ हजार ६०० रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. मैत्रेयची स्थापना विरार येथे झालेली असली तरी त्याची प्रत्यक्ष गुंतवणुकीची सुरुवात जळगाव जिल्ह्यातूनच झाल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर कंपनीला कोणी कशी मदत केली आहे, याची चौकशी पोलीस करीत आहेत.

Fifty five crores fraud in 25,000 Maitreya investors in Jalgaon district | जळगाव जिल्ह्यात ‘मैत्रेय’च्या अडीच हजार गुंतवणूकदारांची साडे पाच कोटी रुपयात फसवणूक

जळगाव जिल्ह्यात ‘मैत्रेय’च्या अडीच हजार गुंतवणूकदारांची साडे पाच कोटी रुपयात फसवणूक

Next
ठळक मुद्दे संचालक जनार्दन परुळेकर जळगाव पोलिसांच्या ताब्यातमुंबईत मिळणार गुंतवणूकदारांनी पैसे ‘मैत्रेय’च्या गुंतवणुकीचा शोध

आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,१२ : ‘मैत्रेय’ने जिल्ह्यातील २ हजार ५५१ गुंतवणूकदारांची ५ कोटी ७६ लाख ६४ हजार ६०० रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. मैत्रेयची स्थापना विरार येथे झालेली असली तरी त्याची प्रत्यक्ष गुंतवणुकीची सुरुवात जळगाव जिल्ह्यातूनच झाल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर कंपनीला कोणी कशी मदत केली आहे, याची चौकशी पोलीस करीत आहेत.
दरम्यान, गजानन साहेबराव पाटील (वय ४१, रा.राधाकृष्ण नगर, जळगाव) यांच्या फिर्यादीवरुन जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या फसवणूक व अपहाराच्या गुन्ह्यात ‘मैत्रेय’ कंपनीच्या चेअरमन वर्षा मधुसूदन सत्पाळकर यांचे भाऊ तथा संचालक जनार्दन अरविंद परुळकेर (रा.वसई, जि.पालघर) याला जिल्हा पेठ पोलिसांनी शनिवारी अटक केली. 
‘मैत्रेय’च्या गुंतवणुकीचा शोध
परुळेकर हा परभणी पोलिसांच्या गुन्ह्यात कारागृहात होता.उपनिरीक्षक एन.बी.सूर्यवंशी व महेंद्र बागुल यांच्या पथकाने त्याला परभणी येथून ताब्यात घेतले. शनिवारी पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी त्याला न्या.पी.वाय.लाडेकर यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी काम पाहिले. दरम्यान, परुळेकर संचालक असल्याने त्याचा कंपनीत किती वाटा होता, कंपनीते जिल्ह्यात किती ठिकाणी व कोणत्या व्यवसायात गुंतवणूक केली आहे, याची चौकशी केली जात आहे. संचालकांनी एजंटमार्फत पैसे वसूल केले आहेत व हे त्याची कुठे गुंतवणूक केली आहे याची चौकशी पोलीस करीत आहेत. 
मुंबईत मिळणार गुंतवणूकदारांना पैसे  
फसवणूक झालेल्या जिल्ह्यातील सर्व गुंतवणुकदारांना मुंबई आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आपली रक्कम मिळणार आहे. जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला रक्कम मिळणार नाही, फक्त ज्या गुंतवणुकदारांनी तक्रार केली नसेल त्यांची पॉलिसीची माहिती नमुन्यात भरली जाणार आहे व ही माहिती देखील मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडेच पाठविली जाणार आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार हा मुंबईतच होणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. 

Web Title: Fifty five crores fraud in 25,000 Maitreya investors in Jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.