सुनील पाटीलजळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा या आठवड्यात धुळे दौरा झाला. धुळ्याला जाण्याआधी मोदी विमानाने जळगावला आले. त्यांच्या आगमनाच्यावेळी काही जणांनी चोरुन व्हिडीओ तयार केल्याचा प्रकार उघडकीस आला. पंतप्रधानांची कडेकोट सुरक्षा पाहता हा व्हिडीओ झालाच कसा?, ज्यांनी व्हिडीओ तयार केला त्यांना विमानतळात प्रवेश कसा मिळाला?, त्यांच्याजवळ पास होता का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित राहत असताना सुरक्षेचे धिंडवडे निघाल्याचा ठपका पोलीस दलावर ठेवून हे प्रकरण पोलीस अधीक्षकांच्या अंगाशी आल्याची चर्चा सुरु झाली. पुढे जावून ही चर्चा थेट पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या बदलीपर्यंत येवून ठेपली. दरम्यान, विमानतळावर पासेसच्या कारणावरुन पोलीस अधीक्षक व जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांच्यातही खटके उडाल्याचे सांगितले जात आहे. खरे तर अंतर्गत सुरक्षा ही राष्टÑीय सुरक्षा एजन्सीची जबाबदारी होती तर प्रवेशद्वाराजवळून आतमध्ये कोणाला सोडायचे व सोडू नये याची जबाबदारी पोलीस यंत्रणेची होती. पंतप्रधानांच्या आगमनाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आयबी या गुप्तचर यंत्रणेने दिल्ली मुख्यालयात अहवाल पाठविला असून त्यात पोलीस यंत्रणेवरच ठपका ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे यात तथ्य असेल तर पोलीस अधीक्षकांची बदली होऊ शकते. नाही तर पोलीस अधीक्षक हजर झाल्यापासून दोन महिन्यात त्यांच्या बदलीची चर्चा रंगायला लागली. शिंदे हे दोन दिवस रजेवर किंवा मुंबई बैठकीला गेले तरी त्यांच्या बदलीची चर्चा होते. या चर्चेची आता त्यांनाही सवय झालेली आहे. बदलीची चर्चा करणारा हा विशिष्ट गट आहे. हाच गट बदलीची अफवा पसरविण्याचे काम करीत आहेत. खरे तर शिंदे यांची जिल्ह्यातील कामगिरी सर्वसामान्य जनतेसाठी नक्कीच कौतुकास्पद आहे. विशिष्ट लोकांनाच शिंदे यांच्या बदलीची चिंता लागली आहे. पोलीस दलातील ८० टक्के अधिकारी, कर्मचारी व सामान्य जनता यांना तर शिंदेची कामगिरी सरसच वाटत आहे. अवैध धंदे बंद झाल्याने गरीब व मजुरी करणाºया कुटुंबाच्या घरात आनंदाचे वातावरण आहे. याच्याशिवाय दुसरा आनंद काय असू शकतो.
पंतप्रधानांचे चित्रीकरण अन् एस.पींच्या बदलीची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 11:03 AM
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा या आठवड्यात धुळे दौरा झाला. धुळ्याला जाण्याआधी मोदी विमानाने जळगावला आले. त्यांच्या आगमनाच्यावेळी काही जणांनी चोरुन व्हिडीओ तयार केल्याचा प्रकार उघडकीस आला. पंतप्रधानांची कडेकोट सुरक्षा पाहता हा व्हिडीओ झालाच कसा?, ज्यांनी व्हिडीओ तयार केला त्यांना विमानतळात प्रवेश कसा मिळाला?, त्यांच्याजवळ पास होता का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित राहत असताना सुरक्षेचे धिंडवडे निघाल्याचा ठपका पोलीस दलावर ठेवून हे प्रकरण पोलीस अधीक्षकांच्या अंगाशी आल्याची चर्चा सुरु झाली.
ठळक मुद्देविश्लेषणविशिष्ट लोकांनाच शिंदे यांच्या बदलीची चिंतापोलीस अधीक्षक व जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांच्यातही खटके